Blog

येळावी जि.प. गटात ‘तुतारी’चा आवाज घुमणार ; डी.के. नाना, श्वेता रोकडे आणि अजित पाटील यांचा घर टू घर प्रचाराचा धडाका!

Rate this post

लोककल्याण न्यूज / संतोष एडके

येळावी जिल्हा परिषद गटातील वासुंबे पंचायत समिती गण, येळावी पंचायत समिती गण ‘तुतारी’ चिन्हाच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जि. प चे अधिकृत उमेदवार श्री डी. के. नाना पाटील, रा राजापूर, वासुंबे पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ श्वेता रमेश रोकडे रा वासुंबे आणि येळावी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार श्री अजित शिवाजी पाटील रा येळावी यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी आणि ‘घर टू घर’ प्रचाराचा धडाका लावला असून अखंड जिल्हा परिषद गटातील गावे वाड्या, वस्त्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह पिंजून काढली आहेत प्रत्येक गावातील मतदारांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

थेट संवाद आणि विकासाचा अजेंडा

​निवडणूक रिंगणात असलेल्या या उमेदवारांनी वासुंबे, येळावी,तुरची, राजापूर , बेंद्री, निमणी – नेहरूनगर यांसह प्रत्येक गावातील वाडी – वस्तीवर , मळे भागात व घराघरांत पोहोचून मतदारांशी संवाद साधला. प्रत्येक मतदाराशी प्रत्यक्ष भेट घेण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. “परिसराच्या शाश्वत विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, मतदारांचा पाठिंबा

​या प्रचार दौऱ्यात उमेदवारांसोबत प्रचार फेरी दरम्यान प्रत्येक गावातील ज्येष्ठ नेते, ग्रामपंचायत,सोसायटीचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. ठिकठिकाणी उमेदवारांचे स्वागत केले जात असून, येळावी जिल्हा परिषद गटात तुतारीचा आवाज घुमताना दिसत आहे. या ‘घर टू घर’ मोहिमेमुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, येळावी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण पूर्णपणे ‘तुतारी’मय झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!