Blog

सांगलीची लोकसभेची जागा धनगर समाजाचा उमेदवार ताकदीने लढणार

1/5 - (1 vote)

जि.प.सदस्य- मा. श्री संजय (दादा) पाटील तुरचीकर यांनी समाज बांधवांच्या बैठकीमध्ये जाहीर केले.

संतोष एडके – संपादक लोककल्याण न्यूज तासगाव

आज तासगाव सांगली रोड वरील ” “माझा ढाबा ” दत्तमाळ वासुंबे येथील मीटिंग हॉल मध्ये तासगाव तालुक्यातील धनगर समाजातील प्रमुख नेते,कार्यकर्ते,समाजबांधव यांच्या उपस्थित मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.देशासह राज्यांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत दोन नंबर असणारा धनगर समाज आहे. अनेक लोकसभा मतदारसंघात प्रभावी मतदान आहे.जे निर्णायक म्हणून बघितले जाते.देशासह राज्यांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत मोठा असणाऱ्या धनगर समाजास सर्वच राजकीय पक्षांनी, प्रस्थापित राज्यकर्त्यांनी केवळ भुलथापा देऊन मतपेटी ‘वोट बँक’ म्हणून आजवर समाजाचा वापर केला आहे. आज पर्यंत देशासह राज्यांमध्ये लोकसभा, विधानसभा यांच्या निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधारी व विरोधी अशा सर्वच राजकीय पक्षांनी व राज्यकर्त्यांनी धनगर समाजाचा ‘वोट बँक’ म्हणूनच वापर केलेला आहे. गेले 60 ते 70 वर्ष झाली धनगर आरक्षण प्रश्न प्रलंबित आहे. प्रत्येक पंचवार्षिक निवडणूक दरम्यान धनगर समाज अनुसूचित जमाती चे आरक्षण अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देऊन जणू मताचे भांडवलच केले जात आहे,असेच चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. धनगर समाजाचे अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करतो असे जाहीर करणे व एकदा का धनगर समाजाच्या जोरावरती निवडून आल्यानंतर, सत्तेत गेल्यानंतर जाणीवपूर्वक एसटी आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देऊन, तो मी नव्हेच अशा पद्धतीने समाजाबरोबर वागणे, व सत्ताधाऱ्यांच्या बद्दल तात्कालीन सत्तेमध्ये असणारे व सध्या विरोधी बाकावर बसून धनगर समाजाबद्दल उसने अवसान आणून खोटे प्रेम, आस्था, दाखवणारे विरोधी बाकावरील नेतेमंडळींनी ही फक्त आणि फक्त धनगर समाजाचा वापर राजकीय भांडवल म्हणून केला आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्येच्या तुलनेत अधिकच असणारा समाज असून सुद्धा देशामधील लोकसभा राज्यामध्ये विधानसभेमध्ये समाजासाठी उमेदवार न देणे प्रतिनिधित्व देण्यास टाळाटाळ करणे.जे जाणीवपूर्वक राजकीय पक्ष करत असल्याचे जाणवते.या सर्वच प्रस्थापित सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्ष व प्रस्थापित राज्यकर्ते यांच्या फसवेगिरीला लगाम घालण्यासाठी किंबहुना सर्वांनाच कडाडून विरोध म्हणूनच येणाऱ्या लोकसभेच्या सांगली मतदारसंघातून धनगर समाजाचा उमेदवार सर्वांच्या सहमतीने उभा करून पूर्ण ताकतीने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी समाज बांधवांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. सदर बैठकसाठी उपस्थित असणाऱ्या समाजातील प्रमुख नेते यांनी आपल्या मनोगत मध्ये समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.आजच्या या बैठकीसाठी जि. प. सदस्य मा. श्री संजय (दादा) पाटील, वासुंबेचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब (नाना)एडके , कवठे एकंदचे माजी सरपंच श्री रामभाऊ (अण्णा)थोरात, ऍड.विनायकराव पाटील साहेब, वासुंबे ग्रामपंचायतचे सदस्य मा. संतोष एडके, मा. विकास मस्के, मा.शितल हक्के, मा.उमेश एडके,मा.सतीश एडके,मा.कुंडलिक एडके, सामाजिक कार्यकर्ते मा. रमेश एडके, मा.लक्ष्मण एडके, तुरची चे माजी सरपंच श्री सदाशिव आप्पा खरात, दीपक पाटील, राहुल शेंडगे, येळावीचे ग्रामपंचायत सदस्य मा.दशरथ गावडे, विजय शेंडगे, अर्जुन हजारे, प्रभाकर पाटील, विशाल कोळेकर, संजय थोरात यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!