8 मार्च महिला दिनानिमित्त वासुंबे ग्रामपंचायतीचा चा अनोखा उपक्रम
संपादक- संतोष एडके / लोककल्याण न्यूज

महिला म्हणजे घर ,घरातील काम, घरातील सर्व दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडणे अशी सर्वच कामे महिला पार पाडत असतात या सगळ्यातून थोडा वेळ महिलांनी स्वतःसाठी, स्वतःच्या तब्येतीसाठी द्यावा. महिलांनी आपले आरोग्य सुदृढ राखावे किंबहुना आरोग्य सुदृढ व्हावे या संकल्पनेतून सर्व सोयीनियुक्त व ट्रेनर च्या मार्गदर्शनाखाली व्यायामशाळा वासुंबे गावामध्ये असावी अशी प्रामाणिक इच्छा गावातील विद्यमान उपसरपंच सौ नेहा ताई हक्के यांनी व इतर ग्रामपंचायत सदस्या महिलांनी ग्रामपंचायत मध्ये मुद्दा उपस्थित केल्यानंतर गावातील सरपंच, गटनेते व इतर ग्रामपंचायती सदस्यांनी, महिला सदस्यांच्या मुद्द्याला पाठिंबा देऊन आज महिला दिनाचे औचित्य साधून फक्त महिलांसाठी सर्व सोयी सुविधेने युक्त व्यायाम शाळा अर्थातच जिमचे उद्घाटन जि प मराठी शाळा सरस्वती नगर वासुंबे या ठिकाणी महिला भगिनींच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण केले.


आज आठ मार्च २0२४ रोजी गावातील माजी पंचायत समिती सभापती सौ मायाताई बाळासाहेब एडके, व जि प.मराठी शाळेच्या शिक्षिका सौ सुनीता रमेश एडके यांचाही आज वाढदिवस होता दोघींचाही सत्कार उपस्थित महिला व सरपंच, गटनेते, ग्रामपंचायत सदस्य,सदस्या, गावातील महिलांनी मिळून सर्वांनी वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.
आजच्या या कार्यक्रमासाठी वासुंबे गावचे सरपंच मा. जयंत पाटील, उपसरपंच मा. सौ नेहा शितल हाक्के, ग्रा प सदस्या सौ. श्वेता रोकडे, सदस्या सौ.शुभांगी एडके, सदस्या सौ.धनश्री चव्हाण, सदस्या सौ.मंजुळा साळे, सदस्य मा. बाळासाहेब ( नाना )एडके, सदस्य मा.संतोष एडके,कुंडलिक एडके, शितलं हाक्के, तसेच पंचायत समितीचे मा. सभापती मा. मायाताई एडके, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष मा. नलिनी पवार, गेंड मॅडम, सुजाता पाटील, शोभा पाटील, मा.सुनीता एडके मॅडम , सोनाली एडके , साक्षी एडके तसेच रमेश एडके,ग्रामसेवक मा.दिपक भंडारे, क्लार्क चेतन एडके व जिम ट्रेनर मा.वैशाली शिंदे मॅडम आदी ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणे उपस्थित उपस्थित होत्या.