तासगाव नगरपालिका: उपनगराध्यक्षपदी प्रसाद पैलवान, तर स्वीकृतपदी तीन नगरसेवकांची वर्णी
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
तासगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आज पार पडलेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया उत्साहात पार पडली. , नूतन नगरसेवक प्रसाद पैलवान यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
काका गटाचे निर्विवाद वर्चस्व काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या थेट निवडणुकीत नगराध्यक्ष आणि २४ नगरसेवकांची निवड झाली होती. यामध्ये ‘काका गटा’ने १३ नगरसेवकासह, थेट नगराध्यक्ष असा विजय मिळविला होता. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी काका गटाच्या सौ. विजया पाटील यांची आधीच निवड झाली असून, आजच्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदी प्रसाद पैलवान यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

स्वीकृत नगरसेवकांची निवड आजच्या सभेत उपनगराध्यक्षांसोबतच तीन स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी देखील निवड प्रक्रिया राबवण्यात आली. नगरपालिकेतील पक्षीय बलाबलानुसार:
- काका गटातर्फे: संदीप सावंत (ढवळवेस) आणि विशाल शिंदे या दोघांची निवड करण्यात आली.
- आमदार रोहित पाटील गटातर्फे: ॲडव्होकेट तुकाराम कुंभार यांची निवड करण्यात आली.
गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी निवडीची अधिकृत घोषणा होताच समर्थकांनी नगरपालिकेबाहेर मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आवाजाने शहर दणाणून गेले होते. निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
