Blog

वासुंबे गावच्या उपसरपंच पदी डॉ.विकास मस्के यांची बिनविरोध निवड

Rate this post

लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव

आज वासुंबे ता.तासगाव येथे आमदार रोहित(दादा) आर पाटील गटाची 14/0 अशी एकहाती सत्ता आहे. सदर ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी डॉ.विकास नवनाथ मस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आली.सदर निवडणूक कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच जयंत पाटील,तसेच ग्रामपंचायत विकास अधिकारी मा. दीपक भंडारे यांनी कामकाज पाहिले,गटनेते मा.बाळासाहेब नाना एडके यांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी पंचायत समिती सभापती मा.सौ मायाताई एडके यांनी शुभेच्छा दिल्या.


ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी डॉ.विकास मस्के यांची बिनविरोध निवड झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. स्व आर आर आबांच्या कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून तालुक्यात परिचित असणारे डॉ. विकास मस्के हे गेले अनेक वर्षे झाले सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असतात.अभ्यासू, उच्चशिक्षित व स्वच्छ राजकारणी व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण तालुक्यात परिचित आहेत. त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे समजले नंतर स्व आर आर (आबा)पाटील यांच्या कुटुंबीयांनी तसेच संपूर्ण तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, मा.संतोष एडके,मा.उमेश एडके, मा.सतीश एडके, मा.नेहा(ताई)हाक्के,मा.शुभांगी एडके, मा.श्वेता रोकडे, मा.धनश्री चव्हाण, मा.मंजुळा साळे, मा.सारिका चव्हाण,मा.भाऊसाहेब आवळे, मा.संगीता पाटील, सौ सोनल सातपुते, आशाताई एडके, उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते मा.शीतल हाक्के, मा.अमर पांढरे,मा.रमेश रोकडे, मा.निलेश चव्हाण, मा.संतोष कोळेकर,मा.कुंडलिक एडके, रमेश एडके, लक्ष्मण एडके वसंतराव वाघमोडे, ज्ञानदेव एडके, संतोष -गोड पाटील, व अन्य ग्रामस्थ ,युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!