लहान बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! सांगली LCB पोलिसांची धडाकेबाज कारवाई, १ वर्षाच्या बालकाला वाचवले
आईच्या कुशीत विसावले बाळ; रत्नागिरीतून आरोपी जेरबंद, सराईत गुन्हेगार इम्तियाज पठाणसह दोघांचा शोध सुरू
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अर्थातच एलसीबी पोलिसांनी अतिशय जलदगतीने आणि संवेदनशीलपणे एका १ वर्षाच्या निष्पाप बालकाच्या अपहरणाचा गुंता अवघ्या तीन दिवसांत सोडवला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण (L.C.B.) शाखेने या अपहरणातील एका मुख्य आरोपीला अटक करून, अपहृत बालकाला रत्नागिरी जिल्ह्यातून सुखरूप मिळवून त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे.
अपहरण आणि गुन्हा
विश्रामबाग चौकात फुगे विक्री करणारे विक्रम बागरी यांच्या १ वर्षाच्या मुलाचे २० ते २१ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री अपहरण झाले होते. या घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३५९/२०२५, भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून, मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास पथके कार्यान्वित झाली. पोलीस निरीक्षक सतिश शिंदे (L.C.B.) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मिरज येथील मुख्य आरोपी इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज (वय ४३) याला अटक केली.
बालकाला विकण्याचा कट
इनायत गोलंदाज याने फरार असलेले इम्तीयाज पठाण आणि वसीमा खान यांच्या मदतीने हे अपहरण केले आणि बालकाला रत्नागिरीतील सावर्डे येथील एका निपुत्रिक दांपत्याला दत्तक प्रक्रियेचे खोटे आश्वासन देऊन पैशांसाठी विकले होते, अशी कबुली दिली. पोलिसांनी लागलीच रत्नागिरी गाठून बालकाची सुटका केली.

तीन दिवसांच्या विरहानंतर आपल्या मुलाला परत मिळाल्यावर आई-वडिलांना आपला आनंद आवरता आला नाही. त्यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानले.
इम्तियाज पठाण सराईत गुन्हेगार
अटक आरोपी इनायत गोलंदाज याला पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार असलेला इम्तीयाज पठाण हा खंडणी, फसवणूक, विनयभंग यांसारखे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार असून, त्याचा आणि वसीमा खानचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
- मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मा. प्रणिल गिल्डा (उप विभागीय पोलीस अधिकारी, मिरज व सांगली).
- तपास पथक: पोलीस निरीक्षक सतिश शिंदे (स्था. गु. अ. शाखा), पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव (विश्रामबाग), सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार (स्था. गु. अ.), सहा पोलीस निरीक्षक चेतन माने (विश्रामबाग), पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील.
- अंमलदार (स्था. गु. अ. शाखा): मसपोफी/सपना गराडे, पोहवा/संदीप नलावडे, अमिरशा फकीर, सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, सतिश माने, अमर नरळे, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, उदयसिंह माळी, महादेव नागणे. मपोहेकों/सुनिता शेजाळे. पोकों/विक्रम खोत, केसबा चव्हाण, विनायक सुतार, सुरज थोरात, सुशिल म्हस्के, श्रीधर बागडी, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, सोमनाथ पंतगे. पोकों/सत्या पाटील (मुख्यालय).
- : पोहेकों/गंगनेष पट्टेकर, उमेश कांबळे, मपोकों/साधना ओमासे (सावर्डे, रत्नागिरी); पोहेका/सचिन सनदी, मपोहेकों/मनिषा बजबळे (मिरज शहर); पोहेका/बिरोबा नरळे, पोकों/प्रशांत माळी, महम्मद मुलाणी, आर्यन देशिंगकर, योगेश पाटील (विश्रामबाग); पोकों/अभिजीत पाटील, अजय पाटील (सायबर पोलीस ठाणे).
- सदर गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग – सांगली पोलीस हे करीत आहेत
