पाचवा मैल येथे एकाचा निर्घृण खून – तासगाव तालुका हादरला.
आठवड्यात दुसऱ्या खुनाची घटना; आरोपी स्वतःहून पोलिसात हजर
लोककल्याण न्यूज / संतोष एडके, तासगाव
तासगाव तालुक्यातील पाचवा मैल (नागाव) येथे आज सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना घडली. या घटनेत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार चेतन उर्फ बुलेट दुर्ग्या पवार (वय ६०, रा. नागाव, ता. तासगाव) याचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी रोहित सुरेशचंद्र मलमे याने शिवीगाळीच्या कारणावरून रागाच्या भरात चेतन उर्फ बुलेट दुर्ग्या पवार याचा खून केला. घटनेनंतर संशयित आरोपी स्वतःहून तासगाव पोलिसात हजर झाला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले. त्याचबरोबर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सागर टिंगरे आणि फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते तासगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला
पुढील तपास पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
