राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून तासगाव येथे दूध भेसळ व शेतकऱ्यांची कर्जमाफी बाबत राज्य सरकारला इशारा.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील शेतकरी व जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी तासगाव येथे तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार श्री अतुल पाटोळे यांना निवेदनाद्वारे राज्य सरकारला इशारा दिला सदर निवेदनात दूध भेसळ तात्काळ थांबवावी तसेच शेतकरी कर्जमाफीबाबत तातडीने निर्णय घ्यावा राज्य सरकारने तात्काळ सदर निवेदनाची दखल न घेतल्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवक पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विश्वास तात्या पाटील, युवकतालुका अध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रामदास जाधव, तालुका कार्याध्यक्ष अरविंद पाटील, चिंतू पाटील, दीपक पाटील, हर्षवर्धन पाटील, विक्रम पाटील, रवींद्र फडतरे, अजय पाटील, चंद्रकांत लोंढे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
