३ सप्टेंबर १९४२ च्या क्रांतीमोर्चा वर्धापन दिन तासगावमध्ये उत्साहात संपन्न :-
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
स्वातंत्र्य सैनिक वारसदार समितीच्या वतीने ३ सप्टेंबर १९४२ च्या क्रांतीमोर्चा वर्धापन दिनाचा कार्यक्रम तासगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात स्मृतीस्तंभाला हार अर्पण करून करण्यात आली. यावेळी तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर लेडवे, मंडल कृषी अधिकारी जाधव मॅडम, ग्रामविकास अधिकारी (तलाठी) अढारी यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.


प्रास्ताविक प्रा. वासुदेव गुरव यांनी केले तर मुख्य मनोगत प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी मांडले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तासगाव मोर्चाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. तसेच पुढील वर्षी ०३/०९/२०२६ रोजीचा वर्धापन दिन आणखीनच भव्यतेने साजरा करण्याचे आवाहन केले. स्मृतीस्तंभाची दुरावस्था दूर करण्यासाठी व तासगावचा विस्मृतीत गेलेला वारसा जतन करण्यासाठी समिती स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांपैकी अनिल माने, अशोक पोरे, जयसिंगराव सावंत, महावीर कोथळे उपस्थित होते. शहरातील ज्येष्ठ नागरिक भिमराव भंडारे, आर. एन. माळी, आयुब मणेर, भास्कर सदाकळे, पांडुरंग जाधव, नुतन परिट यांचीही उपस्थिती होती.
विद्यानिकेतन प्रशालेचे शहाजी खरमाटे आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसह उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अमर खोत यांनी केले.
