Blog

गणेश भक्तांच्या जयघोषात श्रींचा 246 वा पारंपारिक रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार

Rate this post

लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव

तासगाव येथील श्री गणपती देवस्थानचे विश्वस्त पटवर्धन कुटुंबीय, रथाचे मानकरी,महाराष्ट्रा सह राज्यभरातील हजारो भाविक -भक्तांच्या उपस्थितीत गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया च्या जयघोषात गुलाल -खोबरं – पेढ्यांच्या उधळणीत विराट गर्दीत तासगावच्या श्रींचा 246 वा पारंपारिक रथोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात पार पडला.


येथील श्री गणपती पंचायतनच्या प्रसिद्ध उजव्या सोंडेचा गणपती सुमारे 246 वर्षापासून चालू असलेल्या पारंपारिक परंपरेनुसार रथोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली होती. ऋषीपंचमीच्या दिवशी मंदिर परिसरात नेत्र दीपक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी सजावट व स्वागत कमानींनी उजळलेला होता. त्याचबरोबर ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या रथाला आकर्षक पद्धतीने सजावट केली होती.

शहरातील वेगवेगळी पारंपारिक ढोल-ताशा मंडळे त्यांची आकर्षक व लयबद्ध अशी वाद्य रचना , रथा समोर तासगावातील रुबाबदार व डौलदार गौरी हत्ती ने भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेत होते

दुपारी 1 वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीला मान्यवर व पटवर्धन कुटुंबीयांच्या उपस्थितीत स्थान देण्यात आले. 1 वाजून 25 मिनिटांनी राष्ट्रगीत आणि आरतीनंतर गणपती बाप्पा मोरया मोरया च्या गजरात रथयात्रेला प्रारंभ झाला. हजारो भाविक भक्तांच्या मोठ्या उत्साही वातावरणामध्ये मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया , दिवाणजी खोबरं दिवाणजी पेढे या घोषणा देत मोठ्या उत्साहात रथ श्री गणपती मंदिरातून काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आला. तेथे आरती झाल्यानंतर पुन्हा रथ मंदिरात आणण्यात आला.

हजारो गणेशभक्तांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहामुळे आणि भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण तासगाव शहरात गणेशोत्सवाचा उत्साह अनुभवायला मिळाला. गुरुवार पेठ, जोशी गल्ली, पोस्ट ऑफिस समोरील रोड, गणपती मंदिरा- समोरील सांगली रोड या सर्व ठिकाणी मेवा मिठाईच्या दुकानासह, वेगवेगळे खाद्यपदार्थ, खेळण्याचे स्टॉल, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे पाळणे परिसर गजबजलेला होता.

ऐतिहासिक असा पारंपारिक रथ उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व भाविक व रथाचे मानकरी यांचे विशेष योगदान राहिले.

आजच्या रथोत्सवाला उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विश्वस्त पटवर्धन कुटुंबीयांनी सर्व भाविक भक्तांचे, पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!