खुजगाव ग्रामीण मार्ग क्रमांक -२७ चे रु सव्वा कोटी राजकीय श्रेय वादातून परत – २ कि.मी रस्त्याच्या कामाला खोडा.
सुमारे दहा ते पंधरा वर्षे प्रयत्न करून थकलो.
माजी सैनिक – जोतीराम जाधव.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
खुजगांव ता. तासगांव येथील खुजगांव ते फुटकाघाना रस्त्यास २०१२ /२०१३ साली जोतिराम जाधव. माजिसैनिक यांच्या प्रयत्नाने तत्कालीन ख़ासदार व केंद्रीय मंत्री प्रतिकदादा पाटिल यांच्या माध्यमातून ५ किलोमीटर रस्त्यासाठी (PMSY) प्रधानमंत्री सडक योजनतून रू २ कोटी ७९ लाख मंजुर झाले होते.
राजकीय श्रेयवादातून मंजूर केलेल्या रस्त्याचे श्रेय नेमके कुणी घ्यायचे या वादातून सन २०१२ -१३ या कालावधीमध्ये खुजगाव हाद्दीतील २ किलोमीटर रस्ता व सव्वा कोटी परत गेल्याचा व आज अखेर प्रयत्न करूनही वरील रस्ता १० ते १५ वर्ष मंजूर केला जात नसल्याचा आरोप जोतीराम जाधव यांनी प्रेस नोट द्वारे केला आहे.


सदर रस्त्याने ये – जा करणाऱ्या व वाघापुरच्या अंगणवाडी ते हायस्कूलच्या लहान मुलांना शाळेस व शेतकरयांना चीखलातुन गावात दुध घालने चारा ने आन करावे लागते.
हा रस्ता जुना आटपाडी ते मिरज कमी अंतराचा म्हणुन ओळखला जातो.
शक्तिपीठ महामार्गा विषयी राज्य सरकार वर नाराजी व भ्रष्टाचाराचा आरोप :-
शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही शेतकऱ्यांची मागणी नसताना ६ पदरी ८०२ किलोमीटरसाठी ८६ हजार कोटी खर्च केला जात आहे सखोल माहिती घेतल्यास असे समजते की देशात यापूर्वी ८ पदरी रस्त्या साठी प्रति किलोमीटर ४५ ते ५० कोटी खर्च होतो तर नियोजित शक्तीपीठ रस्त्यासाठी एक किलोमीटरसाठी रू १०७ कोटी २३ लाख खर्च दाखवला जातोय याचा आर्थ राज्यात प्रति किलोमीटर ५० ते ६० कोटी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप श्री जोतीराम जाधव यांनी केला आहे .
आमरण उपोषणाचा इशारा :-
२० जानेवारी २० २६ पर्यंत वरील रस्ता न झाल्यास २५ जानेवारी २p२६ ला गावकरी – शेतकरी खुजगाव येथील शाळेत शिकणाऱ्या सदर रस्त्याचा त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन आमरण उपोषणाचा इशारा आमदार, खासदार यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामीण मार्ग रस्ते अधिकारी यांना देण्यात आला आहे.
