तासगावात महिला वाहतूक पोलिसाशी उद्धट वर्तन :- जत येथील तरुणावर गुन्हा दाखल
लोककल्याण न्यूज / तासगाव
तासगाव बसस्थानक चौकात सोमवारी दुपारी महिला वाहतूक पोलिसांशी उद्धट वर्तन केल्याप्रकरणी जत तालुक्यातील अमोल विष्णु काळे (वय 30, रा. काशलींगवाडी) याच्यावर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
कॉन्स्टेबल दिपाली खरात वाहतूक नियंत्रणाचे काम करत असताना, MH-05-AJ-9977 क्रमांकाच्या कारमधून आलेल्या काळे यांनी गाडी थांबवल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत भरचौकात वाद घातला. शासकीय कामात अडथळा आणत पोलिसांविषयी एकेरी भाषेत उल्लेख करत, पोलिसांच्या विषयी सर्वसामान्य जनतेमध्ये चुकीचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
प्रत्यक्ष दर्शनी घटना पाहणाऱ्या नागरिकांच्यातून जत च्या तरुणाबद्दल तीव्र स्वरूपाच्या भावना ऐकण्यात येत होत्या ,
पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी इशारा दिला की, “पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे कोणतेही प्रयत्न सहन केले जाणार नाहीत. असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या वरती कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर नागरिकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान तासगाव पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे
