सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कार्यतत्परता भुईज -सातारा येथील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीस अवघ्या तीन तासात अटक
लोककल्याण न्यूज /संतोष एडके तासगाव
भुईज जिल्हा सातारा येथील भुईज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज पहाटे पाच वाजता एका व्यापाऱ्यास व त्याच्या साथीदारास अज्ञात आठ ते दहा दरोडेखोरांनी मारहाण करून २० लाखाची रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती.
सदर दरोड्याच्या घटनेतील संशयित आरोपी हे मोटार कार सह सांगलीच्या दिशेने गेल्याची माहिती सातारा पोलीस कंट्रोल विभागाने सांगली कंट्रोल विभागाला दिली होती
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली कंट्रोल विभागाने जिल्हा पोलीस प्रमुख मा. संदीप घुगे यांना माहिती दिली जिल्हा पोलीस प्रमुखांनी तात्काळ जिल्ह्यातील सर्वच पोलीस पोलीस स्टेशनला सतर्क राहून गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आदेशित केले होते. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री सतीश शिंदे यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून गुन्हा उघडकीस करणे बाबत सूचना दिल्या होत्या.
भुईज पोलीस ठाणे, जिल्हा सातारा येथे घडलेल्या दरोडयातील आरोपींतानी गुन्हयात वापरलेली मोटार कारचा पोलीस पथक आणि फिर्यादीचे मित्र पाठलाग करीत असताना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकामधील पोलीस हे. कॉ श्री उदय साळुंखे आणि पोहेकॉ श्री सागर टिंगरे यांना माहिती मिळाली कि, योगेवाडीजवळ आरोपींताच्या कारचा अपघात झाल्याने सदरचे आरोपी हे कार सोडून डोंगरवाटेनी पळून गेले आहेत..स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस निरीक्षक सतिश शिंदे आणि त्यांचे पथक सदर भागात असल्याने तात्काळ सदर ठिकाणी जावून स्थानिक नागरीकांच्या मदतीने आजुबाजुचे परीसरात संशयीत आरोपींचा शोध घेतला असता त्यातील आरोपी श्री विनीत राधाकृष्णण, वय ३० वर्षे, रा. पलाकाड, राज्य केरळ हा लपलेलया अवस्थेत मिळून आला. त्यांचेकडे पोलीस पथकाने इतर संशयीत आरोपीतांबाबत चौकशी केली असता त्यांचे साथीदार डोगरातुन पळून गेले असून सदरचा दरोडा हा त्याचे साथीदारांनी मिळून टाकला असल्याची कबुली दिली.

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली,
यांचे मार्गर्शनाखाली :-
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस उप निरीक्षक, कुमार पाटील, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकॉ । उदय साळुंखे, सागर टिंगरे, सुशिल म्हस्के, दरिबा बंडगर, सतिश माने पोकॉ/ सुनिल जाधव
लागलीच सदर आरोपीची वैदयकीय तपासणी करून भुईज पोलीस ठाणेच्या पथकांच्या ताब्यात आरोपी व गुन्हयात वापरलेली मोटार कार देण्यात आली आहे. पुढील तपास भुईज पोलीस ठाणे, जिल्हा सातारा हे करीत आहे.
सदरचा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापुर्वी त्याचेवर हायवेवर दरोडा टाकणे असे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासत निष्पन्न झाले आहे.
.
