तासगाव शहरात हाक्के फोटो स्टुडिओच्या अत्याधुनिक, सर्व सोयी – सुविधेनेयुक्त शाखा नंबर दोन चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
फोटो स्टुडिओ अर्थातच फोटोग्राफीच्या व्यवसायातील तासगाव तालुक्यातील व परिसरातील अग्रगण्य फर्म हाक्के फोटो स्टुडिओच्या तासगाव शहरातील विटा रोड परिसरामध्ये एम एस टॉवर या इमारतीमध्ये सर्व सोयीनी युक्त अशा शाखा नंबर दोन चे उद्घाटन लोकप्रिय आमदार रोहित दादा पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले .

वासुंबेतील गावातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे सर्वांच्या बरोबर प्रेमळ व समजूतदारपणे वागणारे मा. विनायक बाबाजी हाक्के यांनी स. न. -1990 मध्ये आपले कॉमर्स शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या आवडीला व कलेला प्राधान्य देत व तासगाव सह आजूबाजूच्या परिसराची गरज ओळखून सुमारे 35 वर्षांपूर्वी तासगाव येथे हाक्के फोटो स्टुडिओ ची स्थापना केली.
फोटो स्टुडिओच्या सुरुवातीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट, नंतर कलर फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, ड्रोन द्वारे व्हिडिओ शूटिंग असे काळाप्रमाणे बदल घडत गेले व बदलत्या काळाप्रमाणे ग्राहकांच्या आवडी -निवडीनुसार अगदी साध्या फोटोच्या अल्बम पासून ते उच्च प्रतीच्या अल्बम पर्यंत ते उच्च दर्जाच्या व्हिडिओ शूटिंग पर्यंत सेवा या हाक्के फोटो स्टुडिओमध्ये ग्राहकांना दिल्या जातात.
परंतु अलीकडील सोशल मीडियाच्या क्रांतीमुळे सर्वच उद्योग- धंदे, व्यवसायामध्ये, त्याचबरोबर फोटोग्राफी व्यवसायामध्ये अमुलाग्रह बदल होत गेले .

फोटोग्राफीच्या नवनवीन संकल्पना अमलात आणून हाक्के फोटो स्टुडिओ यांनी तासगाव सह आजूबाजूच्या परिसरामधील ग्राहकांच्या आवडी – निवडी व गरजेनुसार हाके फोटो स्टुडिओ शाखा नंबर २ मध्ये लहान बालकापासून, प्री-वेडिंग, लग्न समारंभ, मॅटरनिटी फोटोशूट, फॅमिली फोटो असे वेगवेगळ्या फोटोशूट साठी लागणारे आकर्षक साहित्यसह सर्व एकाच छताखाली तासगाव शहरातील विटा रोड येथे एम एस टॉवर या भव्यदिव्य इमारतीमध्ये मोठ्या प्रशक्त जागेमध्ये हाके फोटो स्टुडिओच्या शाखा नंबर -२ चे चा उद्घाटन समारंभ लोकप्रिय आमदार मा.रोहित दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये व हाक्के कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,फोटोग्राफी, व्यवसायातील असंख्य ग्रामस्थ,माता -भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये दिमाखदारपणे उद्घाटन सोहळा पार पडला. सर्वच उपस्थित मान्यवरांनी हाक्के कुटुंबीयांना, हाक्के फोटो स्टुडिओच्या शाखा नंबर – २ साठी शुभेच्छा दिल्या.