Blog

सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था आळसंद, पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य यांचा प्रथम वर्धापन उत्साहात साजरा.

Rate this post

लेंगरे येथे शुक्रवार दिनांक १३ जून २०२५ रोजी श्री पीर कलंदर बाबा दर्गा लेंगरे येथे सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था यांच्या प्रथम वर्धापनादिन दिनानिमित्त पोलीस निरीक्षक मा. धनंजय फडतरे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांनी प्रशासनाला वेळोवेळी जत्रा, यात्रा,विटा पालखी सोहळा यामध्ये चोरी रोखण्यासाठी, वाहतूक नियंत्रण करण्यासाठी, अशा महत्वाच्या सणा उत्सवावेळी पोलीस प्रशासनास बंदोबस्त कामी मदत केल्याने त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. मा. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या .

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे साहेब, संस्थापक अध्यक्ष अजित जाधव, नंदकुमार पवार , किरण खाडे, अमोल पाटील , त्याचबरोबर संस्थेचे सचिव नितीन सूर्यवंशी, खजिनदार आदित्य जाधव, जिल्हाध्यक्ष ओंकार चिरमे महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा शिंदे, खानापूर तालुका अध्यक्ष नाना मंडलिक, कडेगाव तालुका अध्यक्ष अनिल पाटील, आटपाडी तालुकाध्यक्ष रणजीत देशमुख, तासगाव तालुका अध्यक्ष विकास शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम जगदाळे, सांगली जिल्हा निरीक्षक विक्रम माळी, वाळवा तालुका अध्यक्ष धैर्यशील बाबर, सुवर्णा पाटील, अश्विनी पाटोळे, मंदा माने, सानिका माळी, शिवकन्या कदम, ओंकार पाटील, दशरथ पाटोळे, गणेश माने, सुजित जाधव, दादासाहेब मदने, संदीप शिंदे, हर्षल निकम, महादेव पाटील, विशाल शिंदे, विशाल शिंदे, प्रशांत शिंदे, परवेज मनेर, शैलेश बाबर, महापुरे, प्रेरणा शिंदे,आशिष मोहिते, सचिन कारंडे, सोमनाथ कारंडे, दीपक गायकवाड,नालंदा इनामदार,शीतल कांबळे,अनिता कदम, सिद्धी माळी, तनिष्का गुरव, शिरोळ महिला तालुकाध्यक्ष वंदना तुरंबे, रोहिणी धोत्रे,मंदा माने, जयश्री महापुरे, दीपक गायकवाड, रवी निकम अभिषेक नलवडे संदीप कदम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
या कार्यक्रमासाठी विशेष योगदान लेंगरे चे नवीन पदाधिकारी मन्सूर भैया शेख यांनी विशेष योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!