मंगल कार्यालयात चोरी करणारा चोरटा जेरबंद.
सुमारे – ५, ०६, ०००/- किमतीचे सोने, चांदीचे दागिने हस्तगत – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची या आठवड्यातील तिसरी धडक कारवाई.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
दिनांक ०४/ ०६/ २०२५ रोजी सांगली ते कर्नाळ रोडवरील सुशांत गार्डन मंगल कार्यालयामध्ये लग्नाच्या तिथीच्या दिवशी लग्न समारंभाच्या – लग्नविधीच्या धावपळीमध्ये सर्व वऱ्हाडी व्यस्त असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सोन्याच्या व चांदीच्या दागिनेची चोरी केल्याची फिर्याद सौ अंजली ज्ञानेश्वर कोल्ले राहणार भोरे वस्ती, भोसरे, तालुका माझ जिल्हा सोलापूर यांनी संजय नगर पोलीस स्टेशन, सांगली येथे दाखल केली होती.
सदर चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्ते विरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मंगल कार्यालयात चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.
त्या अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोह / अनिल कोळेकर, दऱ्याप्पा बंडगर व पोकॉ/विक्रम खोत यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, फिरासत फकरुद्दीन शेख, रा. बदाम चौक, सांगली या संशयिताने सुशांत गार्डन नावाचे मंगल कार्यालयात लग्नातील गर्दीचा फायदा घेवुन चोरी केली आहे.
त्या अनुषंगाने सदर संशयितास चौकशी कामी ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव फिरासत फकरुद्दीन शेख, वय २२ वर्षे, व्यवसाय मजुरी, पत्ता बदाम चौक, सांगली, ता. मिरज असे सांगुन, दहा दिवसापुर्वी सांगली ते कर्नाळ रोडवरील सुशांत गार्डन नावाचे मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरु असताना गर्दीचा फायदा घेत कार्यालयातील रुम मध्ये एका बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे सांगुन ते दागिने त्याचे खिशात असलेले रूमालात बांधुन ठेवल्याचे सांगुन सदरचे दागिने हजर केले.
त्यानंतर सदरचे दागिने हे वरील गुन्हयातीलच असल्याची खात्री झाल्याने सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी दोन पंचासमक्ष वरील जप्त केलेले सोन्याचे दागिने पंचनाम्याने जप्त केले असुन संशयित आरोपीसह ताब्यात घेतले आहे.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार :-
माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली – पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पंकज पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस हेड कॉन्स्टेबल – अनिल कोळेकर, अमर नरळे, सतीश माने, नागेश खरात, दऱ्याप्पा बंडगर, सागर लवटे, संदीप गुरव, महादेव नागणे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, पो. ना उदयसिंह माळी, संदीप नलावडे, पो. शि विक्रम खोत, केरूबा चव्हाण, सायबर पोलीस ठाणे कडील पो शि अभिजीत पाटील,
सदर गुन्ह्याचा पुढील तपास संजय नगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.