स्मार्ट मीटर च्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपली भूमिका कधी जाहीर करणार ? की केंद्र व राज्य सरकारच्या होत हो मिळवणार.
सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्मार्ट मीटर बाबत महावितरण ला ग्रामस्थांचा विरोध
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
सध्या देशभरासह महाराष्ट्र राज्य मध्ये महावितरण तर्फे विद्युत ग्राहकांच्या जुन्या मीटरच्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम चालू आहे.

सांगली – कोल्हापूर जिल्ह्याचे स्मार्ट मीटरचे टेंडर हे आदानी ग्रुपला दिले चे समजते सध्या या स्मार्ट मीटर बाबत विद्युत ग्राहकांच्या अर्थातच सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक शंका असून -नवीन स्मार्ट मीटर हे बसविल्यानंतर त्याचे बिल पहिल्या बिला पेक्षा जादा येते, भविष्यामध्ये सदरचे स्मार्ट मीटर चे बिल हे मोबाईल रिचार्ज सारखे याचे मारावे लागणार, रात्री अपरात्री रिचार्ज संपला की आपले विद्युत कनेक्शन बंद होणार आशा एक ना अनेक शंका निर्माण असून त्या शंकांचे निरसन जाहीरपणे कोणच करताना दिसून येत नाही परिणामी महावितरणच्या संबंधित ठेकेदार यांचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसविण्यास गेलेल्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांचे कर्मचारी व विद्युत ग्राहक यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग अनेक ठिकाणी घडल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यामध्ये काही ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन महावितरण च्या स्मार्ट मीटर बसविण्याबाबत विरोध दर्शविला आहे. तर काही मोठ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना व कार्यकर्ते, यांनी विद्युत ग्राहकांच्या मध्ये जागृती करून स्मार्ट मीटर ला विरोध करण्याबाबत प्रबोधन केल्याचे दिसून येते वास्तविक जिथं सरकारी धोरण ठरवणारे सत्ताधारी व विरोधी पक्षातील खासदार व आमदार असतात त्यांची या स्मार्ट मीटर बाबत भूमिका गुलदस्त्यात असल्याचे दिसते , या स्मार्ट मीटर बाबत कोणतेच लोकप्रतिनिधी आपले विचार प्रखडपणे व्यक्त करताना दिसून येत नाहीत या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे सरकारच्या स्मार्ट मीटर च्या धोरणाला सर्वांचाच हो ला हो आहे का हे मात्र सर्वसामान्य जनतेला समजेनासे झाले आहे.