शेतकरी कामगार पक्षाचे तासगाव नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अर्जुन थोरात – जिल्हा सरचिटणीस शेतकरी कामगार पक्ष यांचा इशारा
लोककल्याण न्यूज : संतोष एडके तासगाव
आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस श्री अर्जुन बबन थोरात यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिका तासगाव येथे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

सन 2012 ते सन 2020 पर्यंत तासगाव शहरातील नळ कनेक्शन ला नगरपरिषदे मार्फत पाणी मीटर बसवण्यात आले होते परंतु त्यामध्ये मोठा घोटाळा झाला होता सदर प्रकरणामध्ये अर्जुन थोरात यांनी तासगाव पोलीस स्टेशन तासगाव व सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली व जिल्हाधिकारी सौ सांगली यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने सदर चौकशी कामी पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी प्रशासन कार्यालयाकडून तासगाव नगर परिषदेला पत्रव्यवहार करण्यात आले आहे त्या पत्रव्यवरांच्या अनुषंगाने लवकरात लवकर कारवाई करा
१) आपल्या कार्यालयात प्राप्त असलेले तासगांव पोलीस ठाणे यांचेकडील पत्र जावक. क. ९७२४/२०२४ दि. १४/१०/२०२४ सदर पत्रावर ताबडतोब कार्यवाही करावी.
२) आपल्या कार्यालयात प्राप्त असलेले जिल्हा अधिकारी सो, सांगली यांचे दि. २८/०६/२०२४ रोजीचे क.कावि. कावि-०६/कावि-२५/२०२४ चे पत्र यावर ताबडतोब कार्यवाही करावी.
३) आपल्या कार्यालयात प्राप्त असलेले जिल्हा अधिकारी सोो. सांगली यांचे दि.२८/०६/२०२४ रोजीचे क. कावि/कामी/०६/कावि-२६/२०२४ या पत्रावर ताबडातोब कार्यवाही करावी.
४) तासगांव शहरामध्ये नगरपालिकेमार्फत अत्याधुनिक मोफत शव वाहिका चालु करावी.
तासगांव नगरपालिका कार्यालयाचे ‘कर्मचाऱ्यांच्या हजेरी कामी थंम/अंगठा मशीन बसविणेत यावे व दिवसातून चार वेळा त्याचा वापर करणे (हजेरी लावणे) बंधनकारक करावे
५) तासगांव नगरपालिका कार्यालयाचे ‘कर्मचाऱ्यांच्या हजेरी कामी थंम/अंगठा मशीन बसविणेत यावे व दिवसातून चार वेळा त्याचा वापर करणे (हजेरी लावणे) बंधनकारक करावे.
६ सर्व कर्मचाऱ्यांचे हालचाल रजिस्टर नियीमत व अदयावत ठेवावे.
७) शहरातील नागरिकाकडून आलेले अर्ज व तकारी यांचे निराकरण शासन निर्णय झिरो पेंन्डन्सी या नियमानुसार वेळेत करावे.
८) तासगांव नगरपरिषदेकडून आकारली जाणारी पाणी पट्टी मिटर फी प्रमाणे आकारण्यात यावी.
९) तासगांव नगरपरिषदेकडून होणारी विकास कामे पारदर्शी आणि इस्टिमेंट प्रमाणे व्हावीत त्याप्रमाणे कामे न करणाऱ्या ठेकेदारांची नावे काळया यादीत टाकण्यासाठी वरिष्ठ कार्यालयास शिफारशी कराव्यात.
१०) तासगांव नगरपरिषदेकडून चालू असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल धारकांच्या सर्व समस्या सोडवण्यात याव्यात.
सदरच्या मागण्या १५ दिवसाचे आत मान्य न झालेस शेतकरी कामगार पक्षाकडून नगरपालिकेसमोर तीव्र व उग्र असे आंदोलन करणेत येईल व आंदोलणामध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे
सदर निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी यांना देताना श्री अर्जुन बबन थोरात, पांडुरंग जाधव, अशोक मस्के, आशुतोष देवकुळे, निशांत देवकुळे, कुमार माळी, श्री गुळवे, चव्हाण यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.