भूमीअभिलेखच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांचे हाल
सुधारित आकृतीबंधासह अन्य मागणीसाठी बेमुदत संप
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
भूमि अभिलेख विभागास सुधारित आकृतीबंद मंजूर करणे, कर्मचाऱ्यांना तांत्रिक सुधारित वेतनश्रेणी तात्काळ लागू करणे यासह अन्य मागण्यांसाठी सांगली जिल्हा भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी – कार्यालयासमोर १५ में पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

मंगळवारी सहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच आहे. जो पर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका आंदोलक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आंदोलक अधिकारी व कर्मचारी यांनी जमाबंदी आयुक्त आणि संचालकयांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने भूमी अभिलेखच्या उपसंचालकांनी दि. २३ एप्रिल रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी दि. ५ मे पर्यंत जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख तसेच महसूल मंत्री यांच्याशी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दि. ५ मे पर्यंत आश्वासनांची पूर्तता न झाल्याने दि. १५ मे पासून सांगली जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
या संपामुळे जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे सध्या सर्वत्र जमिनीतील रब्बी पिके, त्याचबरोबर अन्य पिके ही निघालेली असून काही शेतकऱ्यांच्या मध्ये आपापसात, शेजापाजाऱ्यांच्यात जमिनीच्या हद्दीबद्दल वादविवाद असतात बऱ्यापैकी शेतजमिनी रिकामी झाल्यानंतर जमिनीची मोजणी करून हद्द कायम करण्याचे काम काही शेतकरी सरकारी मोजणी द्वारे तर काही शेतकरी खाजगी मोजणी करणाऱ्या द्वारे जमिनीची मोजणीची कामे करत असतात परंतु या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची मोजणीसाठी, हद्द कायमसाठी लागणारी कागदपत्रे व सरकारी मोजणी करणारे मनुष्यबळ संपामुळे उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या भूमी अभिलेखाच्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारून वैतागले असून मानसिक त्रास सहन करण्या पलीकडे शेतकऱ्यांच्या कडे कोणताच पर्याय शिल्लक नाही, सदरचा संप कधी मिटेल हे कोणच ठामपणे सांगू शकत नाही, शासन स्तरावर यावरती योग्य तो तोडगा अथवा अन्य पर्याय काढून शेतकऱ्यांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे