कवठे एकंद परिसरामध्ये शेती पंप, विहिरीवरील विद्युत मोटार, केबलच्या भुरट्या चोरीच्या प्रमाणात वाढ.
वाढत्या भुरट्या चोऱ्यांच्या मुळे शेतकरी वर्ग हैराण.
लोक कल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
कवठे एकंद – नागाव परिसरामध्ये सध्या भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून त्यामध्ये प्रामुख्याने मळे भागातील, ओसाड, ओढ्या काठावरील शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार , बोरवेल मधील पंप, इलेक्ट्रिकल केबल्स, लोखंडी अँगल्स,तारा चोरीच्या घटना गेल्या पंधरा दिवसापासून कवठे एकंद – नागाव परिसरामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत.


काही शेतकऱ्यांनी तासगाव पोलीस स्टेशन तासगाव येथे सदर चोरी झालेल्या घटनेबाबत रीतसर फिर्याद नोंद केली आहे तर काही शेतकऱ्यांनी सदर चोरीच्या घटनेबाबत तासगाव पोलीस स्टेशन येथे नोंद केलेली नाही असेही समजते. वास्तविक पाहता कोणत्याही प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्यानंतर त्याची माहिती अथवा फिर्याद संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित नागरिकांनी द्यावी असे आव्हान लोककल्याण न्यूज च्या वतीने नागरिकांना जाहीर करण्यात येत आहे.