Blog

समाजशास्त्रात आदर्श विद्यार्थी घडतो, करिअरच्या अनेक संधी – डॉ.विकास मस्के

Rate this post

समाजशास्त्र मध्ये अनेक सामाजिक समस्या आहेत,ज्वलंत प्रश्न आहेत अशा घटकांवर जर आपण संशोधन केले आणि आपल्या संशोधन मुळे समाजातील त्या घटकांना न्याय देण्याचे काम केले तर समाजात एक चांगला आदर्श उभा राहू शकतो.समाजशास्त्र विषय हा आपल्या रोजच्या दैनंदिन मधल्या घटकाला धरून आहे.आपण समाजात कसे वावरावे.आपला दर्जा कसा निर्माण करावा, भूमिका कशी असावी,एक आदर्श व्यक्ती कसा असावा हे समाजशास्त्र शिकवते. आज अनेक ठिकाणी समाजशास्त्र विषयात संधी आहेत त्या संधीचे सोनं करण्याची जबाबदारी एक विद्यार्थी म्हणून आपली आहे.असे मत विभागाचे माजी विद्यार्थी व कार्यक्रमाचे पाहुणे डॉ.विकास मस्के यांनी व्यक्त केले

त्याच बरोबर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी नवनवीन सामाजिक समस्यावर संशोधन करून समाजशास्त्रीय संशोधनात आपला ठसा उमटवावा, विद्यार्थ्यांना समाजशास्त्रातून करिअरच्या संधी उपलब्ध आहेत असे उद्गार काढले.  अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व समाजशास्त्र विभागामार्फत “समाजशास्त्र विषयातील करिअर विषयक संधी” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.सामाजिक शास्त्रामधून विद्यार्थ्यांना करिअरविषयक मोठ्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
समाजशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ.विकास मस्के यांनी नुकतीच शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर येथील समाजशास्त्र विषयातून ‘महाराष्ट्रातील धनगर समाजाची सामाजिक चळवळ’ या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.त्यानिमित्ताने त्यांचा विशेष सत्कार व विद्यार्थ्यांना ‘ समाजशास्त्र विषयातील करिअर विषयक संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.विनोदकुमार कुंभार, प्रा.डॉ.घोगरे तसेच प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!