वायफळे ( तासगाव ) येथे बेवारस मयत आढळले :-
संतोष एडके : -तासगाव प्रतिनिधी
वायफळे ता.तासगाव जि. सांगली येथे अनोळखी बेवारस पुरुष मयत अवस्थेत आढळला . सदर बेवारस मयताबाबत सध्या ओळख पटवण्याचे काम चालू असून सदर घटनेबाबत तासगाव पोलीस स्टेशन तासगाव येथे नोंद आहे.

सदर बेवारस मृतदेहा बाबत तासगाव पोलीस तासगाव पोलीस ठाणे तासगाव येथील नोंद असून अमरनं. 203/2024 बी. एन. एस. एस कलम 194 मधील पुरुष जातीचे अनोळखी बेवारस मयत वय अंदाजे 55 ते 60 हे हे दिनांक 29/ 12/ 2024 रोजी दत्त मंदिर, वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे मयत अवस्थेत मिळून आलेले आहे सदर मयताचे अंगावर जांभळ्या रंगाचा फुल बाह्याचा थंडीचे जर्किन, फुल बाह्यांची पांढरी रंगाची बंडी व विज्यार पांढऱ्या रंगाची आहे तरी सदर मयता बाबत ओळख पटवण्या कामी कोणास काही माहिती असल्यास किंवा झाल्यास सदर बाबतची माहिती तासगाव पोलीस ठाणे जिल्हा सांगली यांना खालील संपर्क क्रमांक वर कळविण्यास नम्र विनंती आहे
तासगाव पोलीस ठाणे क्रमांक 02346 240100
पोहेका एम.जी .हजारे मोबाईल क्रमांक 810 804 77 60