तासगाव येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा
निकोप समाज व बळकट लोक शाही करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची : – तहसीलदार पाटोळे
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती अर्थातच पत्रकार दिन व तासगाव तालुका पत्रकार संघाचा वर्धापन दिन याचे औचित्य साधून ” पत्रकार दिन ” तासगाव येथील संस्थामाता सुशीला देवी महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील, प्राचार्य बी, एम. पाटील, संजय माळी , विष्णू जमदाडे, प्रदीप पोतदार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या सोशल मीडियाचे वारे प्रचंड आहे. तरुणाई भरकटत चालली आहे . मात्र तरुणांना त्यांच्या मेंदूला खुराक मिळेल असे वाचायला दिल्यास वृत्तपत्रांचे स्थान कायम अबाधित राहील पत्रकार हा समाजाचा आरसा असून. समाजाच्या उणिवा दूर करण्याचे काम पत्रकार करतात. निकोप समाज व बळकट लोकशाही करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले.
तहसीलदार पाटोळे महणाले, सोशल मीडिया प्रचंड वाढला आहे. यामुळे वृत्तपत्रे वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र आजही वृत्तपत्र ही बातम्यांची विद्यासार्हता ठरवण्याचे प्रमाण मानते जाते. त्यामुळे वृतपत्र ही कधीच बंद होणार नाहीत माणसाचे जीवन अधिक धकाधकीचे बनले आहे. अनेकदा पत्रकारांना विविध कामानिमित्ताने घरापासून दूर रहावे लागते. सुरक्षेच्या दृष्टीने पत्रकारांना विमा पॉलिसी गरजेची आहे. ही बाब लक्षात घेऊन तासगाव तालुका पत्रकार संघाने पुढाकार पेऊन तालुक्यातील पत्रकारांना रुपये १ लाखांच्या विमा पॉलिसीचे वाटप केले
आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील म्हणाले, पत्रकारांच्या खऱ्या अडचणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. मात्र सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्या घटकाला बळ देण्यासाठी आमचा प्रयान राहील.
पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ म्हणाले, समाजात नकारात्मकता वाढत आहे. पण समाजाला सकारात्मकता निर्माण करण्याची चोख भूमिका पत्रकारांनी पार पाडावी.
प्राचार्य बी. एम. पाटील म्हणाले, समाजातील पडणाऱ्या घटना मांडण्याबरोबरच समाजात विधायक
बदल घडविण्यासाठी पत्रकारिता महत्वाची आहे. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असून पत्रकार हा समाजासाठी झटत असतो. त्यामुळे त्याचे वैयक्तिक कौटुंबिक नुकसान होत असते. असे असताना पत्रकारांसाठी कल्याण निधी योजना गरजेची आहे.
अध्यक्ष विष्णू जमदाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संजय माळी यांनी संघटनेचा कामाची माहिती दिली संकेत पाटील यांनी आभार मानले.
अजय जाधव,प्रशांत सावंत, विनायक कदम, गजानन पाटील, मिलिद पोळ , अमोल तुंगे, सागर धाबुगडे, उत्तम जानकर, संतोष एडके, गजानन पाटील, किरण देवकुळे, किरण कुंभार, सोमनाथ साळुंखे, उल्हास सूर्यवंशी, अमोल माने, योगिता माने, प्रदीप पोतदार, हबीरराव पाटील अजित माने, आबासाहेब चव्हाण, विक्रम पाटील, प्रकाश माळी, दत्तात्रेय माळी यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.