डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर चा ताकदीचा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ हरपला.- डॉ बाबुराव गुरव
लोक कल्याण न्यूज / संतोष एडके
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.तासगाव मधील पक्ष संघटना आणि कार्यकर्ते यांनी काॅग्रेस भवन येथे शोक सभेचे आयोजन केले होते.यावेळी काॅग्रेस ओ बी सी सेल चे अध्यक्ष डॉ विवेक गुरव यांनी डॉ मनमोहन सिंग यांच्या आदर्श राजकीय वाटचालीचा आढावा घेतला.
सांगली जिल्हा काँग्रेस चे सेक्रेटरी विशाल चांदुरकर यांनी अमेरिका आणि क्रेमिज विद्यापीठाचे विद्यार्थी ते भारताचे सलग दहा वर्षे पंतप्रधान पद हा प्रवास उलगडला.
तासगाव शहर काॅग्रेसचे शरद शेळके यांनी डॉ मनमोहन सिंग यांच्या स्वभाव वैशिष्टे कशी होती याची माहिती दिली.दलित मित्र भिमराव भंडारे यांनी आदरांजली वाहिली.

डॉ मनमोहन सिंग यांच्या बौध्दिक विद्वत्तेची तुलना करायची झाल्यास, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोलामोलाचा अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ मनमोहन सिंग यांचा उल्लेख करावा लागेल असे मत प्रा डॉ बाबुराव गुरव यांनी मांडले.आंबेडकर आणि डॉ मनमोहन सिंग यांच्या मध्ये फरक काय तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र या बरोबरच धर्मशास्त्र चा गाढा अभ्यास केला.देशातील गरीब माणसाला पैसे मिळाले तर ते बाजारात पैसे परत येताना दिसतात, धनदांडगे यांच्या कडे पैसा आला तर तो बॅकेत जातो.अन्न सुरक्षा कायदा असेल किंवा मनरेगा सारखी योजना असेल त्यांचे श्रेय डॉ मनमोहन सिंग यांना द्यावे लागते.अतिशय नम्र आणि विद्वान असलेला हा माणूस अनपेक्षितपणे भारताचा झाला, त्याचदरम्यान किंवा पुढे मागे असू शकते भारताच्या पंतप्रधान पदी एक शिख व्यक्ती आणि राष्ट्रपती पदी मुस्लिम व्यक्ती डॉ ए पी जे अब्दुल कलाम ही ओळख तयार झाली होती.भारताची ही ओळख सध्या कुठेतरी हरवत चालली आहे काय ?असे वाटते.
प्रा वासुदेव गुरव आणि अमर खोत यांनी या शोक सभेचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला.यावेळी काॅग्रेस, शेकाप, मेंढपाळ आर्मी, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार,आर पी आय ,केसरी प्रतिष्ठान, अंनिस,राष्ट्रसेवा दलांच्या नुतन परिट, नाईक मॅडम ,राजू देवकुळे,भारत थोरात, संभाजी माळी, कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.