Blog

बेदाण्यावरील जाचक जीएसटी रद्द करा

Rate this post

आमदार रोहित पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

लोककल्याण न्यूज / संतोष एडके

राज्यामध्ये भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिलेच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू असून सदर अधिवेशनामध्ये तासगाव -कवठेमंकाळचे आमदार रोहित दादा आर आर पाटील यांनी सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी बेदाणा उत्पादन केल्यानंतर बेदाणा साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला जातो सदर कोल्ड स्टोरेज च्या भाड्यावरती जीएसटी टॅक्स सध्या अस्तित्वात असून हा जीएसटी टॅक्स माफ करण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस यांची अधिवेशनादरम्यान आमदार रोहित पाटील यांनी नागपूरमध्ये भेट घेऊन कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेल्या बेदाणा भाड्यावरती शासनाकडून १८% GST असून व बेदाणा विक्रीवर ५% GST असा एकूण २३% GST चा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत असलेने तो माफ करावा अशी मागणी केली आहे .


आमदार रोहित पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात द्राक्ष पिक घेतले जात असून या सर्व तालुक्यात मिळून सुमारे ३१,७७६ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष पिकाची लागवड असून शेतकरी तयार द्राक्षापासून बेदाणा निर्मिती मोठ्या प्रमाणात करून, त्याला दर मिळण्याच्या अपेक्षेने तयार बेदाणा कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवत असतात. या स्टोअरेजमध्ये ठेवलेल्या बेदाणा भाड्यावरती शासनाकडून १८% जीएसटी असून याच बेदाणा विक्रीवर ५% जीएसटी असा एकूण २३% जीएसटीचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.द्राक्ष पिक घेण्यासाठी भरपूर प्रमाणात औषधे फवारणी करावी लागते त्यावर ही १८% जीसटी असल्याने शेतकऱ्याचे प्रमाणापेक्षा जास्त मिळालेल्या उत्पादनाची रक्कम जीसटी साठी जात असल्याने द्राक्ष्याची औषधे, स्टोअरेजमध्ये ठेवलेला बेदाणा व विक्रीवर बसविलेला जीसटी माफी करावा व शेतकरी बांधवाना जीसटी मुक्त करून त्यांना मदत करावी, अशी मागणी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!