Blog

सांगली जिल्ह्यातील दोन युवा आमदारांच्या विधानभवनाच्या प्रवेशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा 1990 च्या जुन्या आठवणींना उजाळा.

Rate this post

लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगांव.

नवनिर्वाचित युवा आमदार मा सुहास बाबर व मा आमदार रोहित दादा पाटील यांच्या एकत्रित विधानभवनाच्या प्रवेशाने विधानभवनातील अनेकांना मोठा भाऊ व छोट्या भावाच्या 1990 च्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील व स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर या दोन्ही आमदारांच्या विधानसभा सदस्य पदाची आमदारकीची सुरुवात ही 1990 च्या विधानसभा निवडणुकीपासून झाली. या दोन्ही दिवंगत आमदारांच्या मध्ये राजकारणा पलीकडचे मोठा भाऊ व छोट्या भावाचे मैत्रीपूर्वक नाते संबंध होते त्याचा प्रत्यय जनहिताच्या सार्वजनिक कामासह, सार्वजनिक कार्यक्रम असो अथवा एकमेकांना निवडणुकीमध्ये मदत करण्यापासून ते विधानभवनात एकमेकांच्या सार्वजनिक प्रश्नी मदतीला धावून जाणे हे विधानभवनासह महाराष्ट्राने व सांगली जिल्ह्याने पाहिले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तासगाव – कवठेमंकाळ मतदार संघातून नवनिर्वाचित आमदार म्हणून मा रोहित आर आर पाटील व खानापूर -आटपाडी मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार म्हणून मा.सुहास अनिल भाऊ बाबर यांची निवड झाली.

विधानसभा सदस्य पदाची ( आमदार पदी ) निवड झाल्यानंतर विशेष अधिवेशनासाठी दोन्ही नवनिर्वाचित आमदार आज विधानभवनात एकमेकांच्या बरोबर येत होते, या दोन्ही आमदारांच्या एकाच वेळीच्या विधानसभेत येण्याच्या योगा योगामुळे विधानभवनातील सर्वच अधिकाऱ्यांसह, कर्मचारी, व आजी-माजी विधानसभा सदस्य व कार्यकर्त्यांना 1990 च्या स्वर्गीय आर आर पाटील आबा व स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या त्यावेळच्या विधानसभा सदस्य पदी ( आमदारकीच्या ) सुरुवातीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!