तासगाव अर्बन बँकेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला अटक दोन गुन्हे उघडकीस, सांगली एलसीबीची कारवाई
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
सांगली :-
शहरातील मार्केट यार्ड परिसरातील तासगाव अर्बन बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. यातील दोन संशयित पसार झाले आहेत. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. अन्य दोन संशयितांना लवकरच अटक करू अशी माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

ओंकार विशाल साळुंखे (वय १९, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुदर्शन यादव (रा. विश्रामबाग, सांगली, मूळ रा. कराड), मुनीब उर्फ बाबू भाटकर (रा. अंबा चौक, सांगली) अशी पसार झालेल्या चोरट्यांची नावे आहेत. बुधवारी सांगलीतील मार्केट यार्ड परिसरातील तासगाव अर्बन बँकेच्या शाखेत तीन संशयितांनी कडी कोयंडा उचकटून कॅशियर रूममध्ये चोरीचा प्रयत्न केला होता. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते.संशयितांचा शोध घेत असताना पथकातील विक्रम खोत यांना हा चोरीचा प्रयत्न साळुंखे, यादव, भाटकर यांनी केल्याची तसेच ओंकार साळुंखे तात्यासाहेब मळा परिसरात लपल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सॅकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये एक कोयता, कटावणी, मारतूल, चाकू सापडला. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने यादव आणि भाटकर यांच्या साथीने बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. तसेच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक बंद घर फोडून चांदीचे दागिने चोरल्याचीही कबुली दिली. त्याला तातडीने अटक करून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली, मिरज तसेच कराड पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, यांचे मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था.गु.अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था.गु.अ. शाखा, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोहेकॉ/ संदिप गुरव, नागेश खरात, द-याप्पा बंडगर, अनिल कोळेकर, पोहेका / सतीश माने, सागर लवटे, सागर टिंगरे, अमर नरळे पोना/ सुशिल मस्के, संदिप नलावडे, पो.कॉ/ विक्रम खोत, सुरज थोरात, सुमित सुर्यवंशी पो.कॉ./ कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे