शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी रोहित पाटील यांच्या सोबतच राहणार – संजय विभुते
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा महाविकास आघाडीचा आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळणारा असून, तासगाव कवठेमंकाळ विधानसभेचे आघाडीचे अधिकृत उमेदवार रोहित आर आर आबा पाटील यांच्या सोबत आम्ही पूर्ण शक्तींशी राहणार आहोत. असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांनी पक्षाच्या तासगांव तालुका पदाधिकारी बैठकीत केले.

जिल्हाप्रमुख विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली आज तासगाव येथे बैठक संपन्न झाली. मार्गदर्शनाखाली संपन्न. या बैठकीस उपतालुकाप्रमुख पुरण मलमे, उपतालुकाप्रमुख विलासआप्पा जमदाडे, उपतालुकाप्रमुख संदिप मस्के, अल्पसंख्यांक आघाडी तालुकाप्रमुख जुबेरभाई(जॉनभाई), युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद पाटील, माजी तालुकाप्रमुख महेश कोळी, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण, माजी तालुकाप्रमुख अनिल शिंदे, महिला आघाडी माजी तालुकाप्रमुख सौ. मनिषा पाटोळे, विभागप्रमुख निवास भाऊ पाटील, उपविभागप्रमुख पंडीतबापू राजमाने, शाखाप्रमुख, महीला आघाडी सदस्या व सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी सर्वानी महाविकास आघाडी बरोबर राहून रोहित आर. आर. आबा पाटील यांच्या विजयासाठी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार केला.