आबांच्या स्वप्नातील तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विकासपर्व सुरू करण्यासाठी साथ द्या – रोहित आर आर पाटील
कवठेमंकाळ येथील भव्य प्रचार सभेच्या शुभारंभ प्रसंगी केले आवाहन
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचा दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून या मतदारसंघांमध्ये विकासगंगा वाहण्यासाठी आणि नवे विकास पर्व सुरू करण्यासाठी साथ द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित आर आर आबा पाटील यांनी केले. कवठेमंकाळ येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी तासगाव कवठेमहांकाळच्या माजी आमदार सुमनताई आर आर आबा पाटील, काँग्रेसच्या शैलजाभाभी पाटील, जयसिंगतात्या शेंडगे, अनिताताई सगरे, सुरेश भाऊ पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रोहित आर आर आबा पाटील म्हणाले, संपूर्ण राज्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्याधुनिक असा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून तासगाव विधानसभा मतदारसंघ अशी ओळख निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांचे साथ आवश्यक आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसी निर्मिती, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, द्राक्ष खरेदी विक्री केंद्र उभारणी, बेदाणा निर्मिती केंद्रामधील आधुनिकीकरण, त्याचबरोबर रखडलेल्या सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपला सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत आवाज उठवण्यासाठी आपण सर्वजण मिळून संधी देणार आहातच. स्वर्गीय आर. आर. आबांच्या स्वप्नातील अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी आपण मला बळ द्या असे आवाहन त्यांनी केले.



सुरवातीला स्व. चंद्रकांत बापू हाक्के यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शैलजा भाभी प्रकाशबापू पाटील ,जयसिंगतात्या शेंडगे, अनिताताई सगरे, हायुम सावनूरकर, अमित पाटील, संजय पाटील, टि.व्ही.आबा पाटील, ताजुद्दीनभैय्या तांबोळी, जगन्नाथ मस्के , ढेरे सर , संजय आबा पाटील, विश्वास तात्या पाटील, बाळासाहेब काका पाटील, संजय बापू हजारे मारुतीभाऊ पवार , गणेश पाटील, दादासाहेब कोळेकर, युवराजदादा पाटील , सतीश (बंडू ) पवार, विलास आबा कोळेकर , जगन्नाथआबा कोळेकर, विकासभाऊ हाक्के , प्रशांत आण्णा शेजाळ, यांच्यासह इतर मान्यवरांची भाषणे झाली. या सभेसाठी अमरभाऊ शिंदे , शामराव आप्पा पाटील ,महेश पवार ,भगवान वाघमारे , अर्जुन गेंड सर बी.एस पाटील , सुरेखाताई कोळेकर , नलीनीताई पवार, दत्ता हावळे, चंद्रकांत सगरे अय्याजभाई मुल्ला, बद्रुदीन शिरोळकर ,दिलीप काका पाटील राहूल जगताप , महेश पाटील संजय वाघमारे, कुमार दाजी पाटील, महादेव वाघमारे गुरुजी, मोहन लोंढे सर , सागर शेजाळ , अनिल पाटील, दिलीप गिडडे विशाल शिंदे , प्रशांत खाडे , ज्ञानू काका बंडे, ज्ञानूकाका दळवी , दिनकर काका पाटील, जीवन तात्या भोसले , संजयभाऊ भोसले , नामदेव पवार , राकेश चंदनशिवे , शंकर अण्णा कदम विजय कांबळे , शंकरकाका माळी, रवी माने ,शेरखान पठाण राजू घोरपडे , वैभव बोंगार , अमर साबळे, संदीप पाटील, यांच्यासह कवठेमंकाळ तालुक्यातील सर्व आबा प्रेमी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.