रोहित आर आर आबा पाटील यांचा प्रचाराचा झंजावात, मतदारसंघात मिळतोय वाढता प्रतिसाद
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार रोहित आर आर आबा पाटील यांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. रोहित दादा पाटील यांच्या या प्रचार यात्रेस आणि गाव भेटीस उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आज तासगाव तालुक्यात शिरगाव, जुळेवाडी, वासुंबे, मतकुणकी, बेंद्री यासह इतर गावांमध्ये रोहित आर आर आबा पाटील यांनी गावभेटी करत प्रचार दौरा केला. या गाव भेटीमध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांच्यासह ग्रामस्थांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी रोहित दादा यांना महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले. मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता रोहित दादा पाटील यांची प्रचारातील आघाडी लक्षणीय ठरत आहे. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

