वासुंबे येथील विकास मस्के सर यांना पीएचडी पदवी प्रधान
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
वासुंबे तालुका तासगाव येथील श्री विकास नवनाथ मस्के सर, यांना आज समाजशास्त्र विषयातून “धनगर समाजाची सामाजिक चळवळ” याविषयी (phd) अर्थातच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी शिवाजी विद्यापीठा मार्फत बहाल करण्यात आली.
विकास नवनाथ मस्के सर यांचे मूळ गाव वासुंबे तालुका तासगाव हे असून त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून लहानपणापासूनच समाजकार्याची, राजकारणाची आवड असून कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासू वृत्ती त्यांच्या अंगी बालपणापासून असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जि प मराठी शाळा वासुंबे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, पदवीचे शिक्षण तासगाव,व पदव्युत्तर शिक्षण हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले असून समाजशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विकास मस्के सर यांनी श्री विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे समाजशास्त्र विषयाचे ज्ञानदानाचे काम केले आहे.
विकास मस्के सर यांना धनगर समाजाप्रती असणारी तळमळ व धनगर समाजाविषयी असलेल्या प्रेमापोटी धनगर समाजाविषयी सखोल अभ्यास व संशोधन करून आज “धनगर समाजाच्या सामाजिक चळवळी विषयी” डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थातच( phd )ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली.
विकास मस्के सर हे सध्या वासुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून त्यांना सामाजिक कार्याची व राजकरणाची आवड असून दिवंगत नेते आर आर आबा पाटील व युवा नेते रोहित आर आर पाटील व आबा कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची तासगाव तालुकाभर ओळख आहे.
आज डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थातच phd पदवी मिळाल्यानंतर समाजातील वेगवेगळ्या स्तरातून विकास मस्के सरांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोककल्याण न्यूज ने विकास मस्के सर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना विकास मस्के सरांनी त्यांच्या यशाबद्दल सर्व प्राध्यापक वर्गाचे, आई-वडिलांचे, मित्र परिवाराचे आभार मानले व आपण संशोधन केलेल्या “धनगर समाजाच्या सामाजिक चळवळी विषयी ” काही उपाययोजना व मते मांडली आहेत त्याचा राज्य सरकारने जरूर अभ्यास करून धनगर समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, जीवनमान अधिकाधिक कसे उंचावेल यासाठी प्रयत्न करावेत ही अपेक्षा व्यक्त केली.