युवा नेते रोहित पाटील यांच्या प्रचाराचा आज ढवळीमध्ये शुभारंभ
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
तासगाव कवठेमहांकाळ विधान सभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. रोहित (दादा) आर. आर. पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बुधवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ढवळी येथील महादेव मंदिरात होणार आहे.
या प्रचार शुभारंभास महा विकास आघाडी इतर सर्व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. स्व. आर. आर. आबा पाटील यांनी त्यांच्या राजकीय
कारकीर्दीची सुरुवात या ढवळी येथील महादेव मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करूनच केलेली आहे.
आबांचा हा राजकीय आणि सामाजिक वारसा युवा नेते रोहित दादा पाटील हे चालवित आहेत तरी या प्रचार शुभारंभासाठी सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष श्री विश्वास ( तात्या )पाटील यांनी केले आहे.
