विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून सांगली काँग्रेसमध्ये उभी फुट
वसंतदादा घराण्यातील अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता.
काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी नाकारल्या मुळे स्वर्गीय मदन भाऊ गटाचे कार्यकर्ते कमालीच्या आक्रमक.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
विधानसभा निवडणूक २०२४ च्या सांगलीच्या काँग्रेसच्या उमेदवारीवरून उमेदवारीवरून सांगली काँग्रेसमध्ये दोन गटांमध्ये उमेदवारीवरून नाराजी नाट्य सुरू झाले. त्यातच खासदार विशाल पाटील यांच्या अस्पष्ट भूमिकेमुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थ व संभ्रम निर्माण झाला आहे .
काँग्रेस नेत्या व स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाने सांगलीची उमेदवारी नाकारल्यानंतर जावई श्री जितेश कदम व आजी-माजी नगरसेवक त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या समवेत झालेल्या मेळाव्यामध्ये कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना श्रीमती जयश्रीताई पाटील म्हणाल्या माझ्या उमेदवारीचे तिकीट कोणी कसं कसं कापलं, त्याचबरोबर आपल्या राजकीय जीवनात गाडणाऱ्या लोकांना आपण गाडल्याशिवाय राहणार नाही, भावनेच्या भरात पळून जाणारी मी बाई नाही येथून पुढे आपला वापर फक्त जिंकून येण्यासाठीच कुणाला करून द्यावयाचा नाही हे मी पक्के ठरवले असून