जिल्हा प्रशासनाने तासगाव -कवठेमंकाळ भागातील पावसामुळे व गारपीट मुळे नुकसान झालेल्या द्राक्षबाग शेतीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी
युवा नेते रोहित आर आर पाटील यांची कृषी मंत्री व पालकमंत्र्यांच्या कडे मागणी.
मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तासगाव -कवठेमंकाळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तासगाव तालुक्यातील मनेराजुरी सह काही ठिकाणी गारपीट झाली परिणामी येणाऱ्या द्राक्ष हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार आहे.

युवा नेते रोहित आर आर पाटील यावेळी पावसाने व गारपीट झालेल्या द्राक्ष शेती विषयी बोलताना म्हणाले :-
तासगाव कवठेमहांकाळ भागांत काल मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला; मणेराजुरी सह काही ठिकाणी गारपीट झाली ! आधीच सरकारच्या धोरणांनी त्रस्त असलेल्या आणि तोट्यात गेलेल्या द्राक्षे बागायतदार व शेतकऱ्यांना हा मोठा धक्का आहे ! सुलतानी तुन कसेबसे सावरणाऱ्या माझ्या भागातील शेतकऱ्यांना आता अस्मानी संकटांतून वर काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!
माझी कृषिमंत्री मा धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांना विनंती आहे की याची गंभीरपणे दखल घेत प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सूचना देण्यात याव्यात तसेच माझ्या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी !