तासगावचे सचिन शेटे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा प्रमुख पदी निवड…
लोककल्याण न्यूज / संतोष एडके

तासगाव :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाने राज्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना सर्वच आरोग्य योजनांचा मोफत लाभ मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील अशा रुग्णांना रुग्णालयात राखीव कोट्यातून खॉट उपलब्ध करून देणे,निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांना पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत होण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सांगली जिल्हाप्रमुख पदी तासगावचें सचिन ज्ञानेश्वर शेटे यांची निवड करण्यात आली आहे.याबाबतचें नियुक्ती पत्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य प्रमुख राम राऊत सर यांच्या हस्ते सचिन शेटे यांना देण्यात आले आहे.नियुक्तीनंतर बोलताना शेटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे साहेब तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कामं करत असून सांगली जिल्ह्यातील एकही गोरगरीब आणि गरजू रुग्ण उपचाराविना राहणार नाही यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्य विस्तारक गौरव गुळवणी,
प्रशांत साळुंखे कोल्हापूर जिल्हाप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ,महादेव सावंत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख, नितीन हिलाळ वैद्यकीय सहाय्यक ,निलेश गुळवणी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.