सांगली येथे दिवसा घरफोडी करणारा आंतरराज्यीय चोरटा गुजरात ( सुरत ) येथून जेरबंद — – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई- रु – ४, ५०, ०००/- चा मुद्देमाल जप्त.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
सांगली -विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने मा श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व मा. रितु खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करुन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्था गु अ शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशियत इसमांची माहिती काढुन त्याचेंवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्याचा छडा
विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं -285 /2024 बी. एन. एस कलम 331(3),305 प्रमाणे फिर्यादी श्री दत्तात्रय संपतराव पाटील वय वर्ष ४४ रा. स्फूर्ती चौक विश्रामबाग सांगली. यांच्या राहत्या घरी दिनांक १३ /०८/ २०२४ रोजी घरपोडी झाली होती सदर घरपोडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने लंपास केले होते .


सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोहेकों/सागर लवटे यांना त्यांचे बातमीदारांकडुन इसम नामे सॅमसन रुबीन डॅनीअल, वय २५ वर्षे, रा. बेतुरकर पाडा क्वालीटी कंपनी डॅनियल हाऊस, रुम नं. ०५ कल्याण पश्चिम जि. ठाणे यांने सदरचा गुन्हा केल्याची व हा आरोपी सुरत (गुजरात) येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्था. गु. अ. शाखेडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्याचेकडील पथक लागलीच रवाना होवुन सदर आरोपीस सुरत (गुजरात) येथुन ताब्यात घेवुन गुन्हयाचे पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे रिपोर्टासह दि. २८/०९/२०२४ रोजी हजर केले व कायदेशीर अटक केले.
त्यानंतर सदर इसमास यातील तपासी अधिकारी पोउपनि स्वप्नील पोवार यांनी मा. न्यायालयात हजर केलेनंतर मा. न्यायालयाकडुन आरोपीत याची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर झालेनंतर
विश्रामबाग पोलीस ठाणे कडील व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील संयुक्त पथकाने सदर आरोपी इसम सॅमसन डॅनियल यास विश्वासात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी केलेनंतर आरोपीत याने चोरी केलेला मुददेमाल वांगणी जि. ठाणे येथे दिलेला असल्याबाबत माहीती मिळाल्यानंतर मा. वरीष्ठांची परवानगी घेऊन मा पोलीस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे विश्रामबाग पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार यांचे सोबत पोहेकों / बिरोबा नरळे, पोहेकों / दरिबा बंडगर, पोना / संदिप नलावडे, पोकों / महमद मुलाणी व पोकों/ सुनील पाटील यांचे पथकाने वांगणी जि. ठाणे येथे जाऊन वरील मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी कल्याण, रत्नागिरी, जळगाव, सुरत (गुजरात), व खंडवा (मध्य प्रदेश) अशा ठिकाणी गुन्हे दाखल असलेबाबत माहिती मिळालेली आहे. सदरचा आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असुन सदर गुन्हाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार करीत आहेत.