Blog

तासगाव शहरांमध्ये रस्ता रोको आंदोलन : धनगर आरक्षण मुद्द्यावरून समाज बांधव आक्रमक

Rate this post

लोककल्याण न्यूज / संतोष एडके

महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजास ( अनुसूचित जमाती ) एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अमरण उपोषणासह अन्य प्रकारे आंदोलने चालू असून या सर्व प्रकारच्या आंदोलनास पाठिंबा व केंद्र व राज्य सरकारकडून धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीस होणारी टाळाटाळ केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ आज सव्वा बारा च्या दरम्यान तासगाव तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने आज बस स्टॅन्ड चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सर्व समाज बांधव कपाळी भंडारा लावून तासगाव शहरातील बस स्टँड चौकात एकत्र जमा झाल्यानंतर सर्वांनी येळकोट येळकोट- जय मल्हार, धनगर एकजुटीचा विजय असो, कोण म्हणतंय आरक्षण देत नाय, आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. या घोषणेने स्टॅन्ड चौक परिसर दणाणून सोडला होता. सर्व समाज बांधवांनी घोषणा देऊन झाल्यानंतर बस स्टॅन्ड चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आजच्या या आंदोलनाच्या दरम्यान धनगर समाज बांधवांच्या भावना केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात अतिशय तीव्र स्वरूपाच्या होत्या , येणाऱ्या काळामध्ये समाजामध्ये पक्षीय मतभेद विसरून सर्वांनीच एकजूट करणे गरजेचे असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर राज्यातील सत्ताधारी सरकारने लवकरात लवकर धनगर समाजास ( अनुसूचित जमाती) एसटी प्रवर्गात मध्ये समावेश करावा, यासह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील खिलारे कुटुंबीयांच्याकडे असणारे “धनगड “जमातीचा दाखला रद्द करण्यात यावा, यांच्यासह मेंढपाळ बांधवांना मेंढ्या चराई करताना समाजातील काही घटकांच्या कडून त्रास होतो त्या विरोधात कडक कायदा करण्यात यावा या मागण्या राज्य सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम, तासगाव शहरातील बस स्टँड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमरण उपोषण आंदोलन करू व कोणत्याही परिस्थितीमध्ये येणारे काळामध्ये राज्य सरकारास एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात भाग पाडू असा इशाराही आंदोलकांच्या वतीने वतीने आज देण्यात आला.

आजच्या या आंदोलनासाठी तासगाव तालुक्यात सह शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आंदोलकांच्या समोर कवठे एकंदचे माजी सरपंच श्री रामभाऊ अण्णा थोरात, येळावी चे ग्रामपंचायत सदस्य श्री दशरथ गावडे, वासुंबेचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब एडके नाना, माझी जि प सदस्य श्री कुंडलिक नाना एडके, श्री विकास डावरे, श्री अर्जुन यमगर, श्री प्रभाकर पाटील, श्री अर्जुन थोरात, मुकुंद ठोंबरे, श्री संजय दादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. समाज बांधवांच्या वतीने तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री गोडसे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!