उद्या शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी धनगर समाजाच्या वतीने तासगाव येथे रास्ता रोको
आरक्षण अंमलबजावणी बाबत तासगाव तालुक्यातील धनगर समाज आक्रमक
लोककल्याण न्यूज / विकास मस्के

राज्यातील धनगर समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. गेले 70 वर्षे झाली धनगर समाज अनुसूचित जमाती च्या आरक्षण अंमलबजावणी करीत आहे.परंतु सरकारने सातत्याने धनगर समाजाची फसवणूक करीत आहे.आज पर्यंत अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषण राज्यात करण्यात आली.परंतु सरकार जाणीवपूर्वक धनगर समाजाच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे असे स्पष्ट मत धनगर बांधव व्यक्त करीत आहे.

धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी साठी पुन्हा एकदा रास्तावरची लढाई लढण्यास उतरला आहे. म्हणूनच तासगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी तासगाव बस स्टॅण्ड चौक येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहे.तरी या रास्ता रोको साठी मोठया संख्येने धनगर समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन तासगाव तालुका धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
