तासगाव कस्तुरबा रुग्णालय अखेर सुरू होणार.
जिल्हाधिकारी, शासकीय रुग्णालय, पालिकेकडून निर्णय : इमारत आरोग्य पथकाला हस्तांतरित होणार.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके
तासगाव नगरपालिकेच्या कस्तुरबा मल्टिस्पेशालिटी इमारत तासगाव नगरपलिकेकडून ही इमारत मिरज शासकीय रुग्णालयाअंतर्गत असणाऱ्या तासगाव आरोग्य पथकाला हस्तांतर करण्यात येणार असून पुढील महिनाभरात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री स्व आर. आर. पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले होते. यानंतर माजी खासदार संजय पाटील यांनीदेखील प्रयत्न केले. यातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून ही सुसज्ज इमारत पूर्ण करण्यात आली होती.

इमारत पूर्ण झाल्यानंतर तात्काळ सुसज्ज मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू होणे गरजेचे असताना हॉस्पिटल काही केल्या सुरू होईना म्हणून तासगाव – बेंद्रीचे सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल शिंदे यांनी अधिक प्रयत्न केले होते, तर सर्वपक्षीय मोर्चे निघाले होते तासगाव करांच्यासाठी ज्वलंत व अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला होता तर तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांच्याबाबत उदासीनता दिसत होती, सर्वसामान्य तासगावकरांच्या व परिसरातील लोकांच्या मनात या हॉस्पिटल बाबत बाबत अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या. तर अनेक अफवा सुद्धा उठल्या होत्या.
तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री पृथ्वीराज पाटील उशिरा का होईना पण लक्ष घालून ही इमारत मिरज आरोग्य पथकाला तात्पुरती देऊन हॉस्पिटल सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव व मुख्याधिकारी पाटील यांची ऑगस्ट महिन्यात याबाबत बैठक झाली. इमारत बंद ठेवण्यापेक्षा रुग्णांची सेवा होत असेल तर हे काम तत्काळ करण्यात हरकत नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तासगाव आरोग्य पथकाचे प्रमुख डॉ. हजारे म्हणाले, नगरपालिकेच्या कस्तुरबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत आरोग्य पथकाला देण्याबाबत चर्चा झालेली आहे. प्रशासकीय बाबी पूर्ण होऊन हॉस्पिटल लवकरच सुरू होणार.
सुसज्ज हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर अनेक सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याच्या बाबतीत परिपूर्ण सुविधा मिळवून आर्थिक बोजा कमी होऊन तात्काळ आरोग्याच्या सुविधा मिळतील अशी तमाम तासगाव करांसह तालुक्यातील व परिसरातील लोकांची अपेक्षा आहे.