ब्रम्हनाथ विकास सोसायटी वासुंबेच्या चेअरमन पदी श्री अमर भाऊ पांढरे यांची बिनविरोध निवड :



लोककल्याण न्यूज/ संतोष एडके
वासुंबे तालुका तासगाव येथील श्री ब्रह्मनाथ सर्व सेवा विकास सहकारी सोसायटी मर्या.वासुंबे या शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या सोसायटीच्या चेअरमन पदी आज श्री अमर ( भाऊ ) शिवाजी पांढरे रा. वासुंबे यांची बिनविरोध निवड मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आज झाली.


गेल्या अडीच वर्षांपूर्वी ब्रम्हनाथ विकास सोसायटीच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली होती बिनविरोध निवडीच्या वेळी स्व आर आर आबा पाटील गटास श्री बाळासाहेब एडके नाना यांच्या नेतृत्वाखाली सात जागा मिळाल्या, व मा. खासदार संजय काका गटास सहा जागा मिळाल्या होत्या. वासुंबे गावातील दोन्ही गटाच्या नेत्यांच्या संचालक निवडीच्या वेळीच्या चर्चे नुसार अडीच वर्षांपूर्वी सोसायटीच्या सत्ता स्थापना च्या वेळी खासदार संजय काका गटास अडीच वर्षासाठी चेअरमन पद, व स्व. आर आर आबा पाटील गटास व्हाईस चेअरमन पद अडीच वर्षासाठी अशी चर्चा व कार्यकाल ठरला होता.
खासदार संजय काका गटाचा चेअरमन पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल नुकताच संपल्यानंतर आज स्व आर आर आबा पाटील गटाचे नूतन चेअरमन पदी श्री अमर भाऊ पांढरे यांची बिनविरोध निवड मोठ्या उत्साहात करण्यात आली. आजच्या या निवडीच्या वेळी युवा पिढीने मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करत, फटाके फोडत जल्लोष साजरा केला, सर्वांनीच अमर भाऊ पांढरे यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव करत सर्वत्र पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे चे वातावरण निर्माण झाले होते.
आजच्या या चेअरमन निवडीच्या वेळी ब्रम्हनाथ विकास सोसायटीचे संचालक, आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, गावातील सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.