वरूण राजाच्या साक्षीने, हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात तासगाव चा ऐतिहासिक रथ उत्सव संपन्न :
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
पश्चिम महाराष्ट्र सह, कर्नाटक व सीमा प्रांतातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले तासगावातील ऐतिहासिक रथ उत्सव हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे रथाचे विविध समाजाचे मानकरी, गणपती पंचायत ट्रस्टचे विश्वस्त , प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात वरुण राज्याच्या साक्षीने उत्साहात संपन्न झाला.


आज पहाटेपासूनच ” श्रींच्या दर्शनासाठी शहरासह परिसरातील आबाल वृद्धांसह माता-भगिनींनी, तरुणांनी दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावलेल्या दिसत होत्या. तर चालू वेळी पाऊस पाणी बऱ्यापैकी असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते चालू रथोत्सवासाठी मेवा मिठाईचे, चायनीज, भेळपुरी, पाणीपुरी खाऊचे यासह लहान मुलांच्या खेळणीची, सौंदर्य प्रसाधनाची, प्लास्टिक फुलांचे सजावटीचे स्टॉल्सनी गुरुवार पेठ, जोशी गल्ली, फुलून गेली होती चालू वर्षीच्या रथोत्सवासाठी गर्दी ही मोठ्या प्रमाणात होती.
तासगावचा उजव्या सोंडेचा गणपती. हेमाडपंथी मंदिर आणि लोकोत्साही परंपरेने २४५ वा गणेश रथोत्सव हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत ” गणपती बाप्पा मोरया ” मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया ” ताई खोबर, पेढ या गजरात व गुलाल ,खोबऱ्याच्या वर्षावात हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने आज साजरा झाला.
रथोत्सव गणेश भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक व सीमाप्रांतातही हा रथोत्सव सुप्रसिद्ध आहे. या भागातील भाविक भक्तासह हजारोंच्या संख्येने भाविक भक्त रथोत्सवासाठी एकत्र आले होते.तासगावचे तत्कालीन संस्थानिक व मराठा साम्राज्याचे तत्कालीन सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन हे गणेशभक्त होते. त्यांनी इ. स. १७७१ ते १७७९ या नऊ वर्षांच्या काळात तासगाव येथे सुंदर असे हेमाडपंथी गणेश मंदिर बांधले. सन १७७९ मधे फाल्गून शुद्ध चतुर्थी या शुभदिनी उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची प्रतिष्ठापना केली. लोकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, यासाठी तेंव्हापासूनच तासगावमध्ये हा रथोत्सव लोकांच्या अलोट उत्साहात साजरा होत आहे श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी कर्नाटकात श्रीरंगपट्टण येथे पाहिलेल्या रथोत्सवाची कल्पना तासगाव येथे प्रथमच १७७९ मध्ये सुरु केली.
रथ ओढल्यामुळे मनोकामना पूर्ण होते
रथ ओढल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात, अशी गणेशभक्तांची भावना असते. म्हणूनच भाविक रथावर मोठ्या भक्तीभावाने पेढे, नारळ, गुलाल, खोबऱ्याची उधळण करत रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढत नेतात. या रथामध्ये संस्थानची पंचधातूची सिद्धिविनायकाची मूर्ती असते. श्रींचा रथ गुरूवार पेठेतील काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत ओढतात. दुपारी बरोबर एक वाजून पंधरा मिनिटांनी राष्ट्रगीत व आरती झाल्यानंतर या रथोत्सवास सुरवात झाली पालखी, गुलाल, पेढे, खोबऱ्याची उधळण, मंगलमूर्तीचा जयघोष, झांजपथक यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते ढोल, लेझिम पथकांनी रथासमोर भक्तीभावाने आपले सादरीकरण केले काशीविश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत रथ आल्यानंतर त्या ठिकाणी गणपतीची आरती झाली यानंतर रथ पुन्हा गणपती मंदिराकडे परतीच्या प्रवासास निघाला रथ परत गणपतीच्या मंदिरापर्यंत ओढला जातो व रथोत्सव संपतो.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इ. स. १८८५ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र त्याआधी १०६ वर्षे आधीपासून तासगावमध्ये रथोत्सवाची परंपरा सुरु आहे. हा रथोत्सव म्हणजे तासगावच्या ऐतिहसिक, धार्मिक जीवनाचा केंद्रबिंदू आहे. पण तो सामाजिक ऐक्याचा केंद्रबिंदूही ठरला आहे.
आजच्या या रथोत्सवासाठी खासदार विशाल दादा पाटील, माननीय राज्यमंत्री शंभूराजे देसाई, मा. खासदार संजय काका पाटील, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे युवा नेते माननीय रोहित दादा पाटील, यांच्यासह गणपती पंचायत ट्रस्टचे विश्वस्त पटवर्धन कुटुंबीय, दिवाणजी, गणपती देवस्थानची विविध समाजाचे मानकरी, देवस्थानचे पुरोहित यांच्यासह हजारो भाविक भक्त, आबाल वृद्धासह माता-भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
या रतन उत्सवानिमित्त तासगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ वाघ यांचे नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही त्याचप्रमाणे तासगाव पोलिसांच्या वतीने वाहतुकीचे नियोजन योग्य रीतीने केल्यामुळे भाविक भक्तांच्यातून व प्रवाशांच्या मधून समाधान व्यक्त केले जात होते.
,
.
