उचगावात लेसर शो ने डोळा निकामी
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव (ता. करवीर) येथील आदित्य पांडुरंग बोडके (वय- २१) हा गणेशोत्सव आगमन मिरवणुकीत गणपती बघण्यासाठी उचगाव येथील गणेश मंडळ परिसरात गेला होता. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रखर लेसर शो ची किरणे त्याच्या उजव्या डोळ्यावर पडल्याने डोळ्यात आग झाल्याचे जाणवू लागले. डोळ्यात रक्तस्त्राव झाल्याने तातडीने वैद्यकीय उपचारासाठी

कोल्हापूरला नेले. आदित्यने घडलेला प्रकार वडील पांडुरंग बोडके यांना सांगितला. आईवडील यांनी धास्ती घेत शनिवारी
रात्री डोळ्याचा हॉस्पिटल मध्ये दाखल केले. नेहल कम्प्युटर मध्ये शिक्षण घेणाऱ्या आदित्यच्या डोळ्यांवर परिणाम झाला असून तो हवालदिल बनला आहे.
Reply