तासगाव बाजार समितीत अपहार प्रकरणी गुन्हे दाखल करा – विशेष लेखापरीक्षक यांचा तासगाव पोलिसांकडे प्रस्ताव :- मनसेच्या अमोल काळेंच्या पाठपुराव्यास यश.
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव

अखेरच्या लेखापरीक्षणाअंती निदर्शनास आलेल्या अपहाराबाबत जिल्हा सरकारी अभियोक्ता, ९ सांगली यांच्याकडून कायदेशीर अभिप्राय घेतला आहे, तरी संबंधितांवर गुन्हा नोंद करा असा प्रस्ताव विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याकडे दिला आहे. या अपहार प्रकरणी मनसे नेते अमोल काळे हे गेली अडीच वर्षे पाठपुरावा करत आहेत. त्यांनी ४ सप्टेंबर रोजी तासगाव बाजार समितीवर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विशेष लेखापरीक्षक यांनी दिलेल्या अहवालात सांगितले की आम्ही आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावचे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या मुदतीचे लेखापरिक्षण पूर्ण कले असून, त्याचा लेखापरिक्षणचा अहवाल दि.०९/०१/२०२४ रोजी सादर केला आहे. सदरच्या लेखापरीक्षणाअंती निदर्शनास आलेल्या अपहाराचा विशेष अहवाल यासोबत सादर करीत आहे. सदर बाजास समितीमध्ये झालेला अपहार हा विस्तारीत बेदाणा शेतीमाल बांधकामाच्या अनुषंगाने झाला आहे. सदरचा अपहार हा अन्य त्रयस्त मुल्यांकनकार यांचे तपासणी अहवालानंतर निदर्शनास आलेला आहे. तरी संबंधितावरं गुन्हा दाखल करा असा प्रस्ताव लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना दिला आहे.