तासगाव मधील स्वातंत्र्य सैनिक स्तंभाची दुरावस्था कधी संपणार- डॉ बाबुराव गुरव.
. लोकराज्य न्यूज / संतोष एडके तासगाव.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव मधील ऐतिहासिक क्रांती मोर्चा स्मृती दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक स्तभांला डॉ बाबुराव गुरव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या सुजाता म्हेत्रे मॅडम यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
तासगाव च्या ऐतिहासिक मोर्चाचा उल्लेख थेट ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेला दिसतो पणं त्याचं तासगाव मध्ये तासगाव च्या ऐतिहासिक मोर्चाचे स्मरण कोणत्याही राजकीय पक्षांना होत नाही,ही खेदाची बाब आहे. दुर्लक्षित झालेल्या स्वातंत्र्य सैनिक स्तंभाची अवस्था अतिशय खराब झालेली आहे.त्या स्तंभावरील स्वातंत्र्य सैनिकांची नावे सुध्दा स्पष्टपणे दिसून येत नाही.त्यांची नावं गाव आणि त्यांच्या वारसा पर्यंत पोहचण्यासाठी तासगाव मधील सामाजिक संघटना प्रयत्नशील आहेत.
तासगाव चा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक स्तंभाची झालेली दुरवस्था दुर करुन हा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे असे मत डॉ बाबुराव गुरव सर यांनी यावेळी व्यक्त केले.
कृतीशील नागरिकांनी स्वातंत्र्य सैनिक स्तंभांच्या देखभालीसाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला.यावेळी मा माने तलाठी सो , मा भिमराव भंडारे,प्रा वासुदेव गुरव ,प्रमोद म्हेत्रे, पत्रकार दत्तात्रय सपकाळ, विशाल खाडे, राष्ट्रसेवा दलाच्या नुतन परिट,नाईक मॅडम,अंनिस चे अमर खोत आणि नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.