बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ – तासगाव येथे महाआघाडी कडून निषेध व्यक्त.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
लोककल्याण न्यूज / संतोष एडके तासगाव
तासगाव शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आज बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ तासगाव तालुक्यातील च्या वतीने कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.

तासगाव येथील एसटी स्टँड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून गुरुवार पेठेतील शिवतीर्थापर्यंत चालत येऊन कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख प्रदीप माने पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष विश्वास पाटील यांनी बदलापूर मधील घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. शिवाय या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर या पुढच्या काळामध्ये महिलांच्या वरील अत्याचार होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी, प्रशासनाने दक्षता घेतली पाहिजे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी प्रदीप माने पाटील, विश्वास पाटिल, विशाल चंदूरकर, गजानन खुजट वकील, अमोल शिंदे, विशाल शिंदे, अर्जुन थोरात, पुरण मलमे, तानाजी पाटिल, छायाताई पाटिल, विलास जमदाडे, स्वप्नील जाधव, अभिजित पाटिल, दिलीप कोळीगुडे, अजित जाधव, दत्ता हावळे, अमोल पाटिल आणि मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.