तीन सराईत घरपोडी करणारे आरोपी जेरबंद – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई – 3८, लाख ६४, हजार रु चे ५१० ग्रॅम वजनाचे सोने व १६६५ वजनाचा चांदीचा मुद्दे माल हस्तगत.
संपादक /संतोष एडके तासगाव
सांगली शहर परीसरात घरफोडी चोरीचे गुन्हे मोठया प्रमाणात घडत असल्याने मा. वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देवून वेळोवेळी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणं शाखेस घरफोडीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने दि. १९/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोना / संदीप नलावडे, पोहेकों / अरुण पाटील यांना त्यांचे बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, इसम नामे तीफीक जमादार रा. उमळवाड, समीर मुलाणी रा. कुभोज आणि दिपक कांबळे रा. उमळवाड हे काळया रंगाची युनीकॉर्न मोटार सायकल क्र. एम एच ०९ई एच ७११० वरुन चोरीचे सोने व चांदीचे दागिणे विक्री करण्यासाठी हरीपुर जुना रस्ता येथे येणार आहे. नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, हरीपुर जुना रस्ता परीसरात सापळा लावून थांबले असता, काळया रंगाच्या युनीकॉर्न मोटार सायकल क्रमांक एमएच ०९ ई एच ७११० घेवून तिन इसम येवून थांबले. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांना त्यांची नावे गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) तौफीक सिकंदर जमादार, वय ३१ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. मु.पो. उमळवाड, ता शिरोळ, जि. कोल्हापुर २) समीर घोडींबा मुलाणी, वय ३१ वर्षे, व्यवसाय मेकॅनिक, रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर आणि ३) दिपक पितांबर कांबळे, वय २७ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा मु.पो. उमळवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर असे असल्याचे सांगितले. पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यातील युनीकॉर्न मोटार सायकलला अडकवलेल्या पिशवीत वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला. त्याचेकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याबाचत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता तौफिक जमादार याने सागितले की, त्याचा साथीदार समीर मुलाणी यांचे मालकीच्या स्प्लेण्डर मोटार सायकल क्र. एम एच ०९ ई एक्स ५०५२ वरुन माझा साथीदार समीर मुलाणी आणि दिपक कांबळे यांचेसोचत हरीपुर गावात सुमारे ६ महिन्यापासुन वेळोवेळी बंद घरात घरफोडी चोरी करुन चोरी मध्ये मिळालेले सोन्याचांदीचे दागिणे विक्री करणे करीता त्याने चार दिवसापुर्वी वारणालीमधून चोरी केलेल्या युनीकॉर्न मोटार सायकलवरुन दागिने विक्री करणेकरीता तो आला असल्याची कबूली दिली.
सदर बाबत सांगली ग्रामीण, संजयनगर व शिरोळ पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जात मिळालेले सोन्या चांदीचे दागिने व चोरीची मोटार सायकल पुढील तपास कामी पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष जप्त केले. तौफिक जमादार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर सांगली जिल्हयात घरफोडी चोरीचे, मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. समीर मुलाणी याचेवर सातारा जिल्हयात दरोडयाचा गुन्हा दाखल आहे.


आजची ही कारवाई पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोलीसउप निरीक्षक कुमार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा चंडगर, सागर लवटे, अरुण पाटील, अमर नरळे, पोना / संदीप नलावडे, प्रकाश पाटील, सुशिल म्हस्के, पोशि/ सुरज थोरात, चिले.पोना / योगेश पाटील सांगली शहर पोलीस ठाणे, महिला सहा पोलीस निरीक्षक रुपाली बोचडे, सायबर पोलीस ठाणे. पोहेकों / करण परदेशी, पोशि/ कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.