तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या राष्ट्रवादी (शरदचंद्रजी पवार )गटाकडून “महायुती” सरकारचा निषेध..
युवा नेते रोहित दादा आर आर पाटील.
महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील रांजणी येथे शेळी समूह योजना शासनाकडून मंजूर करण्यात आली होती. सरकारकडून सदर योजना रांजणी ता. कवठेमहांकाळ येथील रद्द करून दहिवडी जि. सातारा येथे हलवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याला नवीन प्रकल्प व तरतूद देण्याऐवजी शिल्लक राहिलेला निधी देणे हे तेथील शेतकरी बांधवांवर होणारा अन्याय आहे. सदर योजनेसाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.
सदर योजना मंजूर करून घेत असताना शेतकऱ्यांसाठी घेतली असताना आता मात्र राजकीय आकसापोटी ही योजना कवठेमहांकाळ तालुक्यातून रद्द करण्यात आली. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ येत्या काळात याला या अन्यायाला हद्दपार करेल..! अशी माहिती युवा नेते रोहित दादा आर आर पाटील यांनी दिली.
टीप- सदर जीआर सोबत जोडत आहे.

