तुरची येथील येरळामाई प्राथमिक आश्रम शाळा व संजय दादा माध्यमिक आश्रम शाळा येथे आषाढी एकादशीचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
संपादक : संतोष एडके
आज तुरची येथील येरळामाई प्राथमिक आश्रम शाळा व माननीय संजय (दादा) पाटील माध्यमिक आश्रम शाळा तुरची येथे विद्यार्थ्यांची आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी वारी तुरची गावातून आनंदी भक्तीमय वातावरणात संपूर्ण गावातून दिंडी काढण्यात आली.




दोन्ही शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी पारंपारिक वेशभूषेमध्ये शाळे मधून पालखीसह सामील झाली होते पालखीमध्ये विठ्ठल -रुक्माई व संत बाळूमामा यांच्या मूर्ती होत्या.
प्रारंभी तुरची गावचे सरपंच माननीय श्री विकास डावरे यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले या दिंडीचे संपूर्ण नियोजन शाळेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तम प्रकारे केले होते.
विद्यार्थ्यांच्या मोठ्या उत्साहामध्ये हरी नामाच्या गजरासह टाळ मृदंगाच्या आवाजाने परिसर भक्तिमय होऊन गेला होता.




आजच्या या दिंडी सोहळ्यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संजय दादा पाटील, जिल्हा परिषद सदस्या येळावी गट, मुख्याध्यापिका सौ हर्षला पाटील मॅडम, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,ह भ प तांदळे गुरुजी, शाळेतील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.