Blog

डॉ. श्रीमंत साळे यांच्या जिद्दीला सलाम

Rate this post

वयाच्या ७५ व्या वर्षी तासगाव येथील
डॉक्टर साळेंनी घेतली ॲक्युप्रेशरची डिग्री.

संपादक – संतोष एडके


तासगाव ( दत्तमाळ वासुंबे ) येथील सेवानिवृत्त डॉक्टर श्रीमंत साळे यांनी वयाच्या ७५ व्या व्या वर्षी ॲक्युप्रेशर उपचार पद्धत या कोर्समध्ये उत्तम मार्क्स मिळवून पदवी मिळवली त्याबद्दल त्यांचे वासुंबे तासगाव सह परिसरामध्ये अभिनंदन होत आहे.

जत सारख्या दुष्काळी पट्ट्यात राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दीने वैद्यकीय शिक्षण प्राप्त करून “मानव सेवा हीच ईश्वर सेवा ” या ब्रीदवाक्याला अनुसरून आपली पूर्ण वैद्यकीय कारकीर्द महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यामध्ये निष्कलंक पद्धतीने गोरगरिबांची सेवा करीत पार पाडली. वयाची साठी पार केल्यानंतर शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झाले.
डॉक्टर श्रीमंत साळे यांनी सेवानिवृत्तीनंतरही आपले वैद्यकीय काम अविरतपणे, गोरगरिबांना मोफत वैद्यकीय इलाज देऊन प्रसंगी स्वखर्चाने सांगली – मिरजेत मोठमोठ्या दवाखान्यामध्ये रुग्णांच्या सोबत स्वतः येऊन चांगल्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत परिसरातील रुग्णांच्या वरती उपचार, व नागरिकांना योग्य वैद्यकीय सल्ला देण्याचे काम आजही करीत आहेत.

डॉक्टर साळेंनी वयाच्या ७५ व्या वर्षी सोलापूर येथील अहिल्याबाई होळकर विद्यापीठामार्फत ॲक्युप्रेशर उपचार पद्धती ही पदवी चांगल्या मार्क्सनी मिळवून यश संपादन केले.
डॉक्टर साळेंचे संपूर्ण कुटुंब उच्च शिक्षित असून मोठा मुलगा सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉ.महेश साळे हे असून ते मेंदू विकार तज्ञ लहान मुलांचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. एक मुलगी डॉ सौ माधुरी साळे या भारती हॉस्पिटल सांगली येथे दंतरोग व मौखिक रोग तज्ञ असून सहाय्यक प्राध्यापक म्हणून भारती दंत महाविद्यालय सांगली येथे कार्यरत आहेत. तर सुनबाई प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट सहाय्यक विभाग प्रमुख डॉ. सौ शीतल साळे या पॅथॉलॉजिस्ट म्हणून भारतीय हॉस्पिटल सांगली येथे कार्यरत आहेत. तर दुसरी मुलगी सौ तेजश्री साळे या बेंगलोर येथे सॅमसंग कंपनीमध्ये उच्च अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

डॉक्टरांच्या पत्नी सौ मंजुश्री साळे याही आरोग्य क्षेत्रात आरोग्य शिक्षण पथक तासगाव येथे सेवेत होत्या साळे मॅडम ह्या सुद्धा सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात सक्रिय असून वासुंबे येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत.

डॉक्टर साळे हे नेहमीच सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय असतात डॉक्टरांच्या या ७५ व्या वर्षी ॲक्युप्रेशर क्षेत्रातील अभूतपूर्व यशाबद्दल वासुंबे तासगाव परिसरातील सर्वांच्या कडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!