खा. विशाल दादा पाटील यांचे वासुंबे येथे जंगी स्वागत
संपादक – संतोष एडके
नवनिर्वाचित खासदार मा. विशाल दादा पाटील निवडून आल्यानंतर जिल्हाभर, मतदार संघात आभार दौरा नियोजित केला असून खासदार विशाल पाटील यांनी मंगळवारी वासुंबे – (तासगाव ) गावात आभार दौऱ्या निमित्त भेट दिली असता ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे खासदार विशाल दादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे जंगी स्वागत केले.

मंगळवारी सकाळी साडेदहाचे दरम्यान खासदार विशाल पाटील हे आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत वासुंबे दौऱ्यावर असताना वासुंबे फाटा येथे ग्रामस्थांनी जंगी स्वागत करून खासदार विशाल दादा यांना वासुंबे फाट्यावरील ” त्या धोकादायक वळणा बाबत ” जागेवरतीच चर्चा करून आज अखेर झालेल्या अपघातांची व त्या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या व जायबंदी झालेल्या घटनांची माहिती दिली व ते धोकादायक वळण हटविण्याविषयी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाशी चर्चा करण्याबाबत मागणी करण्यात आली धोकादायक वळणा बाबत व ते धोकादायक वळण कायमस्वरूपी हटविण्याबाबत विशाल दादा पाटील व ग्रामस्थांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली.






वासुंबे फाट्या वरील सकारात्मक चर्चेनंतर ग्रामस्थांच्या समवेत विशाल दादा पाटील यांनी वासुंबे येथे येऊन गावातील ग्रामदैवत ब्रम्हनाथ मंदिरात दर्शन घेऊन मंदिराच्याच परिसरामध्ये गावातील विविध समस्यांच्या बाबतीत गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सोबत केंद्र सरकारच्या संबंधित व राज्य सरकारच्या संबंधित गावातील समस्या सार्वजनिक रस्ते, ग्रामपंचायत इमारत, वासुंबे फाट्यावरील धोकादायक वळण, वासुंबे ग्रामपंचायतच्या नियोजित इमारत बांधकामा संदर्भात चर्चा, गावातील घनकचरा निर्मूलन संदर्भात चर्चा, गावातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग यासह यासह गावातील अत्यंत जिव्हाळ्याचा व ज्वलंत प्रश्न असणारा भारत सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या पाण्याच्या टाकीच्या संदर्भात जागा मिळणे बाबत सकारात्मक व सविस्तर चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान खासदार विशाल पाटील यांनी उपस्थित ग्रावातील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींची सकारात्मक चर्चा करून दिलेल्या मागण्या संदर्भात शासन दरबारी योग्य ती माहिती घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
आजच्या या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सभापती सौ मायाताई एडके, महिला जिल्हा राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या सौ सुजाता पाटील, सो सोनाली सातपुते, यांच्यासह लोकनियुक्त सरपंच श्री जयंत पाटील, गावातील जेष्ठ नेते ग्रामपंचायत सदस्य श्री बाळासाहेब एडके नाना, संतोष एडके, विकास मस्के, शितल हक्के, रमेश रोकडे, सतीश एडके, कुंडलिक एडके, निलेश चव्हाण शरद चव्हाण ,रमेश एडके, अमर पांढरे ,महेश पाटील, उत्तम बाबा पाटील, भोसले दादा, श्री पाटील, सुभाष खराडे, गजानन गोड पाटील,प्राध्यापक राजू मोरे, संतोष कोळेकर ,प्रकाश माळी प्रदीप वाघमोडे , रणजीत ठाकूर, रमेश वाघमोडे ,बाळासाहेब अवघडे, मोहन अवघडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते.